नवनवीन स्कूटर्स आणि अपग्रेडेड बाईक्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांची नेहमीच लगबग असते. नवीन कलरमध्ये लॉंच झालेल्या गाड्या खरेदी करण्याची ग्राहकांची उत्सुकताही वाढलेली असते. आताही ५ नव्या स्कूटर्स अपग्रेड करून बाजारात दाखल झाल्या आहेत. बाईक चालण्याची ज्यांना आवड असते, अशा ग्राहकांना नवीन गाड्या खरेदी करुन लॉंग राईडला जाणेही पसंत असते. बाजारात कोणत्या नव्या स्कूटर्स आणि अपग्रेड केलेल्या बाईक्स उपलब्ध झाल्या आहेत, याविषयी जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

Hero Xoom 110

Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात

हीरो मोटोकॉपने ग्राहकांसाठी xoom 110 स्कूटर लॉंच केली आहे. या स्कूटरची खासीयत पाहून ग्राहकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. ही स्कूटर फंकी, स्पोर्टी आणि मॉडर्न ट्रेंड्समधील आहे. या लॉंच झालेल्या नवीन स्कूटरचा लूक जबरदस्त असून ग्राहकांना पसंत येत आहे. होंडा कंपनीच्या या स्कूटरचा लूक TVS Ntorq 125 या बाईकसारखा आहे. या स्कूटरमध्ये LED DRL सोबत LED प्रोजेक्टर हेडलाईट आणि LED टेललाईटची सुविधा दिलेली आहे. तीन मॉडेलमध्ये हीरो कंपनीची स्कूटर लॉंच करण्यात आलीय. LX,VX आणि ZX असे मॉडेल्स असून पाच रंगांमध्ये या स्कूटर बाजारात दाखल झाल्या आहेत.

Honda 100 CC Hero Splendor

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर्स इंडिया (HMSI) 100 cc कम्यूटर बाईकवर काम करत असून हिरो स्प्लेंडर सारखी अपग्रेडेड व्हर्जन बाईक असणार आहे. २०२० मध्ये या होंडा बाईक बनवण्याचा प्रस्ताव होता. तर नोव्हेंबर २०२२ मध्ये या बाईकची डिझाईन समोर आली. पण या डिझाईनबाबत अद्यापही कंपनीकडून परवानगी देण्यात आली नाही. कारण ग्राहकांसमोर या डिझाईनचं पेटंन्ट समोर आणलं असून त्यांचा या डिझाईनला कशाप्रकारे प्रतिसाद मिळेल, याचा आढावा घेण्यात येणार आहे.

KTM 390 Adventure

ऑस्ट्रियन ब्रॅंडची नवीन SW मॉडेलची स्पोक्स व्हिल्स असणारी KTM 390 अडव्हेंचर बाईक लॉंच करण्यात आलीय. या बाईकमध्ये स्पोक्स युनिटसह ट्यूबलेस ब्लॅक अॅल्यमिनियमचे रिम्सही लावण्यात आले आहेत. या बाईकला लॉंग ट्र्रॅव्हल संस्पेंशन दिले आहेत. तसंच वायर स्पोक्सच्या रिम्ससी लावण्यात आल्या आहेत. तसेच 19 इंच आणि 17 इंचचे फ्रंट आणि रिअर डायमिटरही लावण्यात आले आहेत. या बाईकमध्ये 373 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन लावण्यात आलं आहे. या इंजिनची क्षमता 43.5ps आणि 37 Nm आहे. तसेच या बाईकमध्ये अॅंटी ब्रेक सिस्टमची सुविधाही देण्यात आलीय.

Ninja ZX-4R

अखेर ग्राहकांना प्रतीक्षा असलेली कावासाकी कंपनीची Ninja ZX-4R लॉंच झाली आहे. या बाईकमध्ये ZX-4R,ZX-4R SE आणि ZX-4RR,ZX-25R आणि ZX-6R अशाप्रकारचे मॉडेल्स आहेत. या बाईकमध्ये 399 सीसीचे इंजिन असून रॅम एअर इनटेक शिवाय 77PS आणि रॅम इनटेकसोबत 80PS ची सुविधा देण्यात आली आहे. या बाईकमध्ये 4.3 इंचाचा कलर LCD डिस्प्ले लावण्यात आला असून याला स्मार्टफोन कनेक्टिवीटीही देण्यात आली आहे. तसंच यामध्ये ट्रॅक मोडची सुविधाही आहे.

Yezdi Scrambler Bold Black

ही बाईक बोल्ड ब्लॅक कलरमध्ये लॉंच झाली असून नवीन शेडमध्ये या बाईलका जबरदस्त लूक देण्यात आला आहे. या अॅडव्हेंचर बाईकला रेड आणि ग्रे ग्राफिक्सने डिझाईन करण्यात आली आहे. या बाईकची दिल्लीतील एक्स शो रुमची किंमत 2,09,900 इतकी आहे.