a man got 22 lakh repair estimate for Volkswagen car worth rupees 11 lakh | Loksatta

अबब.. कार ११ लाखांची अन दुरुस्ती किंमत चक्क २२ लाख, कंपनीच्या अंदाजी खर्चाने ग्राहक हैराण

एका कार चालकाला त्याच्या वाहनाच्या दरुस्तीसाठीचा अंदाजित खर्च हा चक्क २२ लाख रुपये सांगण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही किंमत त्याच्या वाहनाच्या किंमतीपेक्षा दुप्पट आहे.

अबब.. कार ११ लाखांची अन दुरुस्ती किंमत चक्क २२ लाख, कंपनीच्या अंदाजी खर्चाने ग्राहक हैराण
प्रतिकात्मक छायाचित्र (pic credit – pixabay)

एका कार चालकाला त्याच्या वाहनाच्या दरुस्तीसाठीचा अंदाजी खर्च हा चक्क २२ लाख रुपये सांगण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही किंमत त्याच्या वाहनाच्या किंमतीपेक्षा दुप्पट आहे. अनिरुद्ध गणेश असे या व्यक्तीचे नाव आहे. खर्च पाहून नाराज झालेल्या गणेशने आपली खदखद नंतर लिंक्डइनवर व्यक्त केली.

अनिरुद्ध यांच्याकडे ११ लाख रुपये किंमतीची व्होल्क्सवॅगनची पोलो ही कार आहे. बंगळुरूमध्ये नुकत्याच आलेल्या पुरामध्ये त्यांच्या कारचे नुकसान झाले होते. कार पाण्यात बुडाली होती. मग दुरुस्तीसाठी तिला व्हाईटफिल्ड येथील अ‍ॅपल ऑटो या ठिकाणी पाठवले. २० दिवसांनंतर त्यांना त्यांच्या कारच्या स्थितीबाबत माहिती मिळाली. कारच्या दुरुस्तीसाठी २२ लाख रुपये अंदाजी खर्च सांगण्यात आला. ही फार धक्कादायक बाब होती. कारण वाहनाची किंमत केवळ ११ लाख इतकी होती.

(वाहनातून निघणाऱ्या काळ्या धुराच्या समस्येला गांभीर्याने घ्या, ‘हे’ करा, अन्यथा होईल मोठे नुकसान)

नंतर अनिरुद्ध यांनी या विषयी बिमा कंपनीशी संपर्क केला. यावर त्यांनी ‘कार लॉस’ झाल्याचे नमूद करण्यात येईले, तसेच कार दुकानातून आणली जाईल, असे सांगितले. बाजारात कारचे मुल्य केवळ ६ लाखच असल्याचे अनिरुद्ध यांना समजले. अशात त्यांना पुन्हा निराश करणारी माहिती मिळाली.

credit – LinkedIn/Anirudh Ganesh

बिघाड झालेल्या कारचे कागदपत्र देण्यासाठी कंपनीने परत ४४ हजार रुपयांचा अंदाजित खर्च मागितल्याचा आरोप अनिरुद्ध यांनी केला आहे. जो की बाजार भावानुसार केवळ ५ हजार रुपये इतका असतो. या सर्व बाबींनी संतापून गणेश यांनी झालेल्या घटनेची माहिती लिंक्डइनवर शेअर केली.
अनिरुद्ध यांची पोस्ट समाज माध्यमावर प्रचंड चालली. ११ लाख रुपये किंमतीच्या कारचा दुरुस्ती खर्च २२ लाख रुपये येणे हे खरच आश्चर्यचकित करणारे आहे. दरम्यान, अनिरुद्धने आपली लिंक्डइन पोस्ट अपडेट करून नंतर व्होल्क्सवॅगन कंपनीने आपली समस्या सोडवल्याचे सांगितले आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Petrol-Diesel Price on 2 October 2022: पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

संबंधित बातम्या

रणबीरच्या ‘त्या’ अनोख्या वाहनाची चर्चा, मुंबईतील व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या खास फीचर्स
Petrol-Diesel Price on 1 December 2022: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये मोठी उलाढाल; पाहा नवे दर
सर्वात स्वस्त ७ सीटर कार! लूक एकदम नवीन, पेट्रोलसोबत CNG चाही पर्याय उपलब्ध
Bike Ride with Dog : व्यक्तीने श्वानासोबत दिल्ली ते लडाख असा बाईकने केला प्रवास, पाहा व्हिडिओ
स्वस्त आणि दमदार ७ सीटर SUV शोधताय? पुढील वर्षांत लाँच होणार ‘या’ तीन दमदार SUV

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“मी काल पवार साहेबांशीही बोललो, ते म्हणाले…”, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’बाबत राज ठाकरेंचं वक्तव्य
‘RRR’ समलैंगिक संबंधांवरील चित्रपट असल्याच्या दाव्यावर राजामौलींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी लोकांच्या…”
विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम; फेसबुकवर ५० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार करणारा जगातील पहिलाच क्रिकेटर
पुणे:‘नदीकाठ’ योजनेसाठी पुन्हा पर्यावरणीय मंजुरी प्रक्रिया?
Maharashtra Breaking News Live : मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; वाचा राज्यभरातील घडामोडी एका क्लिकवर