A mother of five children traveled from Kerala to Qatar by SUV to watch the Fifa World Cup by car alone | Loksatta

SUV ची कमाल! ‘ती’ पाच मुलांची आई पोहोचली केरळहून थेट Fifa World Cup कतारला!

लिओनेल मेस्सीला लाईव्ह खेळताना पाहण्यासाठी थेट SUV ने पोहोचली कतारला.

SUV ची कमाल! ‘ती’ पाच मुलांची आई पोहोचली केरळहून थेट Fifa World Cup कतारला!
Messiची फॅन केरळहून थेट SUVने पोहचली कतारला.(Photo-instagram.com/naajinoushi_solo_momtraveller)

Fifa World Cup: सध्या कतार येथे फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२ स्पर्धा सुरु आहे. हा वर्ल्ड कप पाहण्यासाठी जगभरातून फुटबॉल रसिक कतारमध्ये दाखल झाले आहेत. फिफा विश्वचषकाची क्रेझ केवळ यजमान देश कतारपुरती मर्यादित नसून ते भारतातही आपले पंख पसरवत आहेत. नुकतीच केरळमधील एका महिला तिचा आवडता फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघाचा खेळ पाहण्यासाठी चक्क ‘कस्टमाइज्ड एसयूव्ही’ कार ने एकटीच केरळ ते कतार पोहोचली. आता या महिलेची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.

SUV गाडीतून ‘असा’ केला प्रवास

३३ वर्षीय नाजी नौशी असे या महिलेचे नाव असून विशेष म्हणजे नाजी, ही पाच मुलांची आई आहे. हिने सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. कतारमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी नाजी यांनी १५ ऑक्टोबरला त्यांच्या SUV गाडीतून केरळमधून प्रवास सुरू केला. नौशीने प्रथम तिची ‘SUV’ मुंबईहून ओमानला पोहोचवली आणि योगायोगाने उजव्या बाजूचे ‘स्टीयरिंग’ वाहन देशात पाठवलेली पहिली भारतीय नोंदणीकृत कार आहे. तिने मस्कत येथून प्रवास सुरू केला आणि हाटा बॉर्डरवरून तिच्या एसयूव्हीमध्ये यूएईला पोहोचले. यादरम्यान ती दुबईतील जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा पाहण्यासाठी थांबली.

(आणखी वाचा : Second Hand Car Market: सेकेंड हँड कार खरेदी करताय? मार्केटमध्ये ‘या’ गाड्यांना सर्वाधिक मागणी; फीचर्स आणि मायलेजच्या बाबतीत दमदार )

SUV मध्येच तयार केलं स्वयंपाकघर

SUV मध्ये घरातील ‘स्वयंपाकघर’ आहे आणि त्याच्या छताला एक तंबू जोडलेला आहे. नौशीने कारचे नाव ‘ओलू’ ठेवले आहे, ज्याचा मल्याळममध्ये ‘ती’ (स्त्री) अर्थ आहे. नौशीने तांदूळ, पाणी, मैदा, मसाले आणि इतर सुक्या गोष्टी गाडीत ठेवल्या आहेत. तिने वृत्तपत्राला सांगितले की, ‘मी स्वतः स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते. यामुळे पैशांची नक्कीच बचत होते आणि ‘फूड पॉयझनिंग’चा धोकाही कमी होतो. त्यांचा हा प्रवास केवळ लिओनेल मेस्सीला (Leo Messi) लाईव्ह खेळताना पाहण्यासाठी असल्याचे तिने सांगितले.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 17:17 IST
Next Story
यंदाच्या हिवाळ्यात कारने लॉंग ट्रिपचा किंवा लॉंग ड्राईव्हचा प्लॅन आखताय, मग जाणून घ्या रेडिएटर फ्लश का आवश्यक आहे?