A R rehman daughter bought porsche taycan : भविष्य इलेक्ट्रिक कारचे असेल हे तिच्या वाढत्या लोकप्रितयेवरून स्पष्ट होत आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे ग्राहक इलेक्ट्रिक कारकडे वळत असून पारंपरिक वाहनांपेक्षा अधिक रेंज ही तिची खासियत लोकांना भुरळ घालत आहे. वाढत्या मागणीमुळे अनेक स्पोर्ट कार निर्मिती कंपन्या या क्षेत्रात उतरल्या आहेत. पोर्श ही संपूर्ण इलेक्ट्रिक स्पोर्ट कार सादर करणाऱ्यांपैकी एक होती. अनेक सेलिब्रिटी इलेक्ट्रिक कारला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. दिग्गज संगीतकार ए.आर रेहमान देखील इलेक्ट्रिक कारच्या चाहत्यांमध्ये सामील झाले आहेत. रेहमान यांनी नुकतेच आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर त्यांच्या मुलीने खरेदी केलेल्या नवीन PORSCHE TAYCAN इलेक्ट्रिक स्पोर्ट कारचे छायाचित्र पोस्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छायाचित्रामध्ये खातिजा रेहमान आणि राहिमा रेहमान या दोन्ही मुली नवीन इलेक्ट्रिक कारसोबत पोज देताना दिसत आहे. एआर रेहमानला तीन मुले आहेत आणि सर्वांनी त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. खतिजा रेहमान या संगीतकार आणि एआर रेहमान फाउंडेशनच्या दिग्दर्शक आहेत.

(१ डिसेंबरपासून हिरो मोटोकॉर्पच्या दुचाकींची वाढणार किंमत)

कारमध्ये काय आहे खास?

पोर्श टेकॅन इलेक्ट्रिक कार १८ रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असून रेहमान यांच्या कुटुंबीयांनी जेनशियन ब्ल्यू मेटालिक हा रंग असलेली कार घेतली आहे. कारवर गडद निळा शेड फार उत्तम दिसतो. कारला चार दरवाजे असून २०१९ मध्ये ती ग्राहकांसाठी सादर करण्यात आली होती. भारतीय बाजारपेठेत ही कार २०२२ साली उपलब्ध करण्यात आली होती. टेकॅन आरडब्ल्यूडी, टेकॅन ४ एस, टेकॅन टर्बो आणि टेकॅन टर्बो एस या चार व्हेरिएंटमध्ये ही कार भारतासाठी उपलब्ध आहे. रेहमान यांच्या मुलींनी कोणते व्हेरिएंट खरेदी केले याची माहिती नाही.

पोर्श टेकॅन इलेक्ट्रिक स्पोर्ट कारची किंमत १.५३ कोटी (एक्स शोरूम) रुपयांपासून ते २.३४ कोटी रुपयांपर्यंत आहे. टर्बो एस हे टेकॅनचे सर्वोच्च व्हेरिएंट असून त्यामध्ये एडब्ल्यूडी सिस्टिम मिळते जे नियमित व्हेरिएंट्समध्ये मिळत नाही. कारमध्ये फ्रंट आणि रिअर एक्सेलमध्ये इलेक्ट्रिक मोटर बसवली आहे. या दोन्ही मोटर्स मिळून ७६१ पीएसची शक्ती आणि १५० एनएमचा टॉर्क निर्माण करतात. कारची टॉप स्पिड २६० किमी प्रति तास असून ती ० ते १०० किमी प्रति तासाचा वेग केवळ २.८ सेकंदात गाठते. त्यामुळे ही कार जगात विकल्या जाणाऱ्या काही स्पोर्टकार प्रमाणेच शक्तीशाली समजली जाते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A r rehman daughter bought porsche taycan electric car ssb
First published on: 29-11-2022 at 13:32 IST