Govinda Cars Collection: आपल्या अभिनयानेच नव्हे तर, नृत्यशैलीने देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. ९०च्या दशकांत गोविंदाने आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळवून हसवले. बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. गोविंदा हा त्याच्या डान्स स्टाइलसाठी ओळखला जातो. आता एक हजार कोटींच्या पॉन्झी घोटाळ्यासंदर्भात ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेता गोविंदाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण आज आपण या अभिनेत्याच्या ताफ्यात कोणकोणत्या महागड्या कार आहेत, हे जाणून घेणार आहोत.

गोविंदाकडे अनेक महागड्या गाड्यांचा संग्रह

Mercedes-Benz GLC

मर्सिडीज कारचे अनेकजण चाहते आहेत. त्यातीलच एक गोविंदाही आहे. नुकतीच नवीन जनरेशनची GLC लाँच करण्यात आली आहे. ही कार फ्रेश आणि स्पोर्टी लूकमध्ये आहे. नवीन आयब्रो स्टाइल डेटाइम ड्रायव्हिंग लाइट्स, नवीन त्रिकोणी टेललाइट्स बसवण्यात आले आहे. गोविंदाकडे असणाऱ्या या कारची किंमत ६४ लाख रुपये असल्याची माहिती आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

(हे ही वाचा : ४ लाखांहून कमी किमतीत येणाऱ्या मारुतीच्या ‘या’ ५ सीटर कारवर देशातील ग्राहक फिदा; मायलेज ३६ किमी )

Mercedes C 220d

जर्मनीची लक्झरी कार कंपनी मर्सिडीज बेन्जने भारतात आपलं सी-क्लासचं नवीन फेसलिफ्ट मॉडल लॉन्च केलं आहे. या कार्समध्ये A-Class रेंजच्या कारमधील सिग्नेचर डायमंड पॅटर्न असलेलं ग्रिल डिझाइन देण्यात आलं आहे. हेच डिझाइन C300d AMG लाइन वर्जन मध्येही देण्यात आलं आहे. गोविंदाच्या ताफ्यात ही कार असल्याची माहिती आहे. ज्यांची किंमत सुमारे ४३ लाख रुपये आहे.

Toyota Fortuner

टोयोटा फॉर्च्यूनर ने फुल साइज एसयूव्ह सेगमेंटमध्ये धुमाकूळ घातला आहे. ही सेगमेंटची टॉप सेलिंग कार बनली आहे. अभिनेता गोविंदाकडे ३४ लाखाची टोयोटा फॉर्च्यूनर कार असल्याची माहिती आहे. तसेच त्यांच्याकडे ह्युंदाई क्रेटा देखील आहे.