आर्मी टॅंकसारखा लूक, निवडणूक प्रचार अन्...; पवन कल्याण यांची खास गाडी पाहिली का? | Actor Politician Pawan Kalyan has shared photo of his special election campaign vehicle which looks like army tank know its features | Loksatta

आर्मी टॅंकसारखा लूक, निवडणूक प्रचार अन्…; पवन कल्याण यांची खास गाडी पाहिली का?

पवन कल्याण यांच्या चर्चेत असणाऱ्या गाडीची वैशिष्ट्य जाणून घ्या

आर्मी टॅंकसारखा लूक, निवडणूक प्रचार अन्…; पवन कल्याण यांची खास गाडी पाहिली का?
पवन कल्याण यांच्या चर्चेत असणाऱ्या गाडीबद्दल जाणून घ्या (फोटो : पवन कल्याण/इन्स्टाग्राम)

राजकारणात प्रवेश केलेले अभिनेते पवन कल्याण सध्या एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या निवडणूकीच्या तयारीमध्ये व्यग्र आहेत. यादरम्यान प्रचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या गाड्या हे विशेष आकर्षण ठरत आहे. त्यांनी निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी एक विशेष गाडी बनवली आहे. ही गाडी आर्मी टॅंक प्रमाणे दिसत असल्याने, सध्या सर्वत्र या गाडीची चर्चा होत आहे. या गाडीची वैशिष्ट्य काय आहेत जाणून घ्या.

पवन कल्याण यांनी सोशल मीडियावर या गाडीचे फोटो शेअर केले आहेत. देवी वराहीच्या नावावरून या गाडीचे नाव ‘वराही’ ठेवण्यात आले आहे. ‘वराही निवडणूकीच्या लढाईसाठी तयार आहे’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. या गाडीमध्ये अंतर्गत लाईट्स उपलब्ध आहेत. म्हणजेच जर रस्त्यावर प्रकाश नसेल तरीही या गाडीला कोणतीही अडचण येणार नाही.

आणखी वाचा: कार्तिक आर्यनच्या ‘या’ आवडत्या बाईकचे इलेक्ट्रिक व्हेरियंट फक्त २१ हजारात आणा घरी! महिन्याचा ‘इतका’ EMI

या गाडीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचे साउंड सिस्टीम बसवण्यात आले आहेत. यामुळे गाडीपासून लांब असणाऱ्या व्यक्तींनाही गाडीमधून करण्यात आलेल्या घोषणा ऐकू येतील. यामध्ये स्पेशल सीक्युरीटी फीचर्स बसवण्यात आले आहेत.

आणखी वाचा: सोनू सूदने मारला नव्या BMW 7 मधून फेरफटका, जाणून घ्या या कारची आकर्षक फीचर्स

या गाडीला चार बाजुंना सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहे. ज्याद्वारे निवडणूकीचा प्रचार सुरू असताना लाईव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. यासाठी एक खास सर्व्हरही तयार करण्यात आले आहे. एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या निवडणूकीच्या प्रचारासाठी या गाडीचा वापर केला जाईल. संपूर्ण आंध्रप्रदेशमध्ये या गाडीतून प्रचार केला जाईल असे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 16:12 IST
Next Story
कार्तिक आर्यनच्या ‘या’ आवडत्या बाईकचे इलेक्ट्रिक व्हेरियंट फक्त २१ हजारात आणा घरी! महिन्याचा ‘इतका’ EMI