ऑटो सेक्टरमध्ये एंट्रीसाठी अदानी ग्रुपने कंबर कसली; इलेक्ट्रिक वाहनांची करणार निर्मिती!

जमीन आणि पाण्यावर चालणाऱ्या वाहनांसाठी एसबी अदानी ट्रस्टला ट्रेडमार्क मिळाला आहे

REUTERS-ADANI-GROUP-STOCKS-1200
ऑटो सेक्टरमध्ये एंट्रीसाठी अदानी ग्रुपने कंबर कसली; इलेक्ट्रिक वाहनांची करणार निर्मिती! (REUTERS)

अदानी समूहाचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे. ऑटो सेक्टरमध्ये एन्ट्रीसाठी गौतम अदानी यांनी कंबर कसली आहे. लवकरच अदानी ग्रुप इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणार असल्याची चर्चा आहे. जमीन आणि पाण्यावर चालणाऱ्या वाहनांसाठी एसबी अदानी ट्रस्टला ट्रेडमार्क मिळाला आहे, यामध्ये बस आणि ट्रक या दोन्हींचा समावेश आहे. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. कंपनीचे इलेक्ट्रिक वाहन समूहाच्या स्वतःच्या वाहतुकीशी संबंधित कामासाठी वापरले जाईल. याशिवाय, ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनवेल आणि देशभरातील इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा तयार करेल.

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात, टाटा समूह आणि मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या देशातील दोन मोठ्या कॉर्पोरेट्स वेगाने आपले पाय पसरत आहेत. शून्य कार्बन उत्सर्जनासाठी दोन्ही ग्रुपची मोठी योजना आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वेगाने विस्तारत आहे. अदानी, अंबानी आणि टाटा समूह यांसारख्या कंपन्यांच्या प्रवेशामुळे ही बाजारपेठ चांगलीच स्पर्धात्मक बनली आहे.

इलेक्ट्रिक दुचाकी तयार करण्यासाठी एलएमएल कंपनी सज्ज; हार्ली डेविडसनचं उत्पादन करण्याऱ्या कंपनीसोबत भागीदारी

व्यावसायिक इलेक्ट्रिक गाड्यांच्या निर्मितीत टाटाच्या Ace आणि अशोक लेलँडच्या Dost ब्रँडचा बोलबाला आहे. दोन्हीच्या इलेक्ट्रिक मॉडेल्सची क्रेझ वाढत आहे कारण वाहतूक खर्च खूपच कमी आहे. या वाहनांसाठी प्रति किलोमीटर किंमत सुमारे ८० पैसे ते १ रुपया आहे. तर डिझेलसाठी त्याची किंमत सुमारे ४ रुपये प्रति लिटर आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Adani received trademark approval for vehicles operating on land and water rmt

Next Story
इलेक्ट्रिक दुचाकी तयार करण्यासाठी एलएमएल कंपनी सज्ज; हार्ली डेविडसनचं उत्पादन करण्याऱ्या कंपनीसोबत भागीदारी
फोटो गॅलरी