'ग्रँड विटारा'नंतर टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत | After Grand Vitara Toyota Urban Cruiser Hyryder Launched in India Know price of Each Varient | Loksatta

‘ग्रँड विटारा’नंतर टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर या दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आल्या आहेत.

‘ग्रँड विटारा’नंतर टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर भारतात लाँच; जाणून घ्या किंमत
(Photo – Toyota)

मारुती सुझुकीच्या ‘ग्रँड विटारा’ हा एसयुव्ही नुकतीच भारतात लाँच झाली. यापाठोपाठ आता टोयोटा किर्लोस्कर मोटरने अर्बन क्रुझर हायरायडर भारतात लाँच केली आहे. या दोन्ही गाड्यांचा एकत्र उल्लेख होत आहे कारण या दोन्ही गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही गाड्यांमध्ये माइल्ड आणि स्ट्रॉंग हायब्रिड दोन्ही प्रकारचे इंजिन देण्यात आले आहे. मारुती सुझुकी आणि टोयोटा किर्लोस्कर या दोन्ही कंपन्यांनी मिळुन या गाड्यांच्या डिझाईन आणि टेक्नॉलॉजीचा शोध लावला आहे.

अर्बन क्रुझर हायरायडरच्या लाँचसह त्याच्या सर्व व्हेरीयंटच्या किंमतींचा खुलासा करण्यात आला आहे. याच्या बेस व्हेरियंटची किंमत १०.४८ लाख तर टॉप व्हेरीयंटची किंमत १८.९९ लाख रुपये आहे. ही कार २८ किमी प्रति लीटर मायलेज देईल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

Car Tips : कार नेहमी नव्यासारखी राहावी यासाठी वापरा ‘या’ टिप्स

सर्व व्हेरीयंटसची किंमत

 • ई एमटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १०.४८ लाख रुपये
 • एस एमटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १२.४८ लाख रुपये
 • एसटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १३.४८ लाख रुपये
 • जी एमटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १४.३४ लाख रुपये
 • एस ई ड्राइव्ह २ डब्लूडी हाईब्रिड – १५.११ लाख रुपये
 • जीटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १५.५४ लाख रुपये
 • वी एमटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १५.८९ लाख रुपये
 • वीटी २ डब्लूडी नियो ड्राइव्ह – १७.०९ लाख रुपये
 • वी एमटी ऑल व्हील नियो ड्राइव्ह – १७.१९ लाख रुपये
 • जी ई ड्राइव्ह २ डब्लूडी हाईब्रिड – १७.४९ लाख रुपये
 • वी ई ड्राइव्ह २ डब्लूडी हाईब्रिड – १८.९९ लाख रुपये

ग्रँड विटारा आणि अर्बन क्रुझर हायरायडरचे सर्व फीचर्स जवळपास सारखे आहेत. दोन्ही गाड्या ४ मीटर म्हणजेच मिड साईझ एसयुव्ही मधील आहेत. ग्रँड विटाराची किंमत १०.४५ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2022 at 19:19 IST
Next Story
होंडाच्या ‘या’ नव्या दुचाकीची माहिती झाली उघड; जाणून घ्या फीचर्स…