scorecardresearch

Premium

आनंद महिंद्रांकडून बुध्दिबळपटू प्रज्ञानंदला ‘ही’ इलेक्ट्रिक SUV मिळणार भेट; किंमत पाहून थक्क व्हाल

आनंद महिंद्रा हे विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्यांना नवीन महिंद्रा वाहने भेट देण्यासाठी अनेकदा चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा रंगली आहे.

Anand Mahindra gift electric car
आनंद महिंद्रा भेट देणार इलेक्ट्रिक कार (फोटो : indianexpress)

महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्यांना नवीन महिंद्रा वाहने भेट देण्यासाठी अनेकदा चर्चेत असतात. आता त्यांनी बुद्धिबळ विश्वचषकात आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचीच मनं जिंकणाऱ्या १८ वर्षीय आर प्रज्ञानंदला इलेक्ट्रिक SUV भेट देण्याची मोठी घोषणा केली आहे.

आनंद महिंद्रांनी केलं ट्विट

आर प्रज्ञानंद हा भारतातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहे. आनंद महिंद्रा यांनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ‘X’ (ट्विटर) वर ट्विट करून प्रज्ञानंदच्या पालकांना नवीन Mahindra XUV400 भेट देण्याची घोषणा केली. आनंद महिंद्रा यांनी राजेश जेजुरीकर, कार्यकारी संचालक आणि सीईओ (ऑटो आणि फार्म सेक्टर), महिंद्रा अँड महिंद्रा यांना त्यांच्या ट्विटमध्ये टॅग केले, जेणेकरून ते प्रज्ञानंद यांना नवीन वाहन भेट देण्याची त्यांची संकल्पना शेअर करू शकतील. प्रत्युत्तरादाखल, जेजुरीकर यांनी महिंद्रा XUV400 च्या स्पेशल एडिशनच्या डिलिव्हरीसाठी प्रज्ञानंद आणि त्यांच्या पालकांना पुष्टी दिली आणि त्यांचे अभिनंदन केले.

Cozy Cardio
‘रोज गाणी ऐकत ४५ मिनिटे घरातच चाला’ असे सांगणारा Cozy Cardio व्यायाम नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सर्वकाही
Who is Satish Malhotra
खऱ्या आयुष्यातील ‘बॉस’! कर्मचार्‍यांचा पगार वाढवण्यासाठी चक्क स्वतःचा पगार केला कमी, कोण आहेत सतीश मल्होत्रा?
Sanjay Raut on Manipu mention Narendra Modi
“मणिपूरची परिस्थिती भयंकर, विद्यार्थ्यांना गोळ्या झाडून…”; मोदींचं नाव घेत संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले…
Manmohan singh birthday
वित्तरंजन : धोरणकर्ते डॉ. मनमोहन सिंग

(हे ही वाचा : मारुतीच्या Baleno सह ‘या’ आठ लोकप्रिय कारची मागणी बाजारात थंडावली; पाहा यादी)

Mahindra XUV400 मध्ये काय आहे खास?

ही कार ३४.५ kWh आणि ३९.४ kWh अशा दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येतें दोन्हीमध्ये फ्रंट-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशन आणि इलेक्ट्रिक मोटर आहे, जी १५०PS कमाल पॉवर आणि ३१०Nm पीक टॉर्क जनरेट करते. ३४.५ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक ३७५ किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो. तर ३९.४ kWh बॅटरी पॅक ४५६ किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो. या कारची किंमत १५.९९ लाख रुपयांपासून सुरू होते ती १८.९९ लाख रुपयांपर्यंत आहे. 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anand mahindra has announced his intentions to gift an xuv400 to the family of indian chess prodigy pdb

First published on: 31-08-2023 at 18:12 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
मराठी कथा ×