ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर महिंद्राची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार XUV 400 चा टिझर शेअर केला आहे. या टिझरमध्ये XUV 400 वर महिंद्राचा नवा लोगो दिसत आहे. ही इलेक्ट्रिक कार ८ सप्टेंबरला सर्वांसमोर येणार आहे. बऱ्याच दिवसांपासुन या कारची चर्चा होती. अखेर ही कार लवकरच लाँच होणार आहे.

XUV 400 या कारमध्ये कोणकोणते फिचर्स असतील याबाबत अनेक अंदाज लावण्यात येत आहेत. जून महिन्यात या कारची टेस्टिंग सुरू झाली आहे असा रिपोर्ट जाहीर करण्यात आला होता. या कारची लांबी ४.२ मीटर असण्याची शक्यता आहे, असे असले तरी सबसिडीचा लाभ घेता येणार आहे.

आणखी वाचा : डिझेल गाड्यांची क्षमता अल्पावधीमध्ये का खालावते? संशोधनामधून समोर आलं कारण

आणखी वाचा : कशी असेल मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार? कंपनीकडून किंमत आणि फीचर्सबद्दल नवा खुलासा

XUV 300 पेक्षा वेगळा लूक
XUV 400 ही नवी इलेक्ट्रिक कार XUV 300 वर आधारित असणार आहे. पण या नव्या कारचा लूक वेगळा असणार आहे. यात नवीन डिझाइन केलेले टेलगेट आणि बंपर डिझाइन वापरण्यात आले आहे. तसेच त्याची टेललॅम्प डिझाइन पूर्णपणे बदलण्यात आली आहे. यामध्ये नवीन हेडलाइट्स, क्लोज्ड फ्रंट ग्रिल आणि अलॉय व्हील्स असतील. या कारमध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय असतील. ३५०V आणि ३८०V चे पॉवरट्रेन उपलब्ध असतील.

बॅटरी फीचर्स
रिपोर्टनुसार याच्या छोट्या बॅटरीची रेंज कमी आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ३०० ते ३५० किलोमीटरचे अंतर पार करू शकते. मोठी बॅटरी यापेक्षा अधिक अंतर पार करू शकते. या कारची तुलना टाटाच्या नेक्सॉन ईवीशी केली जाण्याची शक्यता आहे.