CNG Car Care: वाढत्या महागाईमुळे आणि पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हल्ली अनेक जण CNG कारची निवड करतात. इंधन म्हणून सीएनजी खिशाला परवडणारे आणि पर्यावरणास अनुकूल आहे. शिवाय CNG कार पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत चांगले मायलेज देतात. तसेच CNG वर चालणाऱ्या कार या हायब्रीड कार असतात, ज्या पेट्रोल आणि CNG या दोन्हीवर धावू शकतात.

या कार इंधन कार्यक्षम आणि कमी प्रदूषणकारी असल्याने त्यांची मागणी वाढत आहे. बऱ्याच लोकांनी त्यांच्या सध्याच्या पेट्रोल कारमध्ये CNG किटदेखील बसवले आहे. परंतु, CNG कारसाठी चांगली देखभालही तितकीच आवश्यक आहे. तसेच CNG वर चालणाऱ्या सर्व वाहनांना त्यांच्या सिलिंडरची हायड्रोसाठी दर तीन वर्षांनी एकदा चाचणी घेणे आवश्यक आहे.

CNG कारसाठी महत्त्वाच्या टिप्स

  • नियमित तपासणी करा

दरवर्षी तुमच्या CNG किटची तपासणी करा आणि सर्व्हिस करा. झीज झाल्यामुळे होणारे नुकसान तपासा. एअर फिल्टर स्वच्छ करा किंवा आवश्यक असल्यास बदला. थ्रॉटल बॉडी स्वच्छ ठेवा आणि तुमच्या CNG सिस्टमचे इतर भाग चांगल्या स्थितीत ठेवा.

  • CNG टाकी तपासा

अधिकृत सेवा सुविधेवर तुमच्या CNG टाकीची नियमितपणे तपासणी करा. कोणतीही हानी, गंज किंवा क्रॅक आहे का हे तपासा. वॉल्व नियमितपणे बदला. टाकी ओव्हरफिलिंग टाळा.

  • कार उन्हात पार्क करू नका

CNG मध्ये साठवलेल्या वायूचे उष्णतेमध्ये वेगाने बाष्पीभवन होते, त्यामुळे तुमची कार नेहमी सावलीत पार्क करा, जेणेकरून तुमचा सिलेंडर जास्त काळ टिकेल.

  • स्पार्क प्लग तपासा

CNG कारसाठी स्पार्क प्लग नियमितपणे तपासा, स्वच्छ करा आणि बदला, कारण तो लवकर संपतो. तुमच्या सध्याच्या कारवर CNG किट बसवल्यास, CNG स्पार्क प्लग बदला.

हेही वाचा:

हेही वाचा: ट्रॅफिकमध्ये गाडी अडकल्यावर काय काळजी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्सने होईल मदत

CNG कारमध्ये या गोष्टींचे पालन करा

  • कारमध्ये बसून कधीही धूम्रपान करू नका.
  • तुमची कार कधीही CNG मोडमध्ये सुरू करू नका.
  • CNG कार कधीही कमी इंधनावर चालवू नका, कारण त्यामुळे व्हॉल्व्हवर दबाव वाढू शकतो.
  • CNG रिफिलिंग करण्यापूर्वी कार बंद करा, चावी काढा आणि ड्रायव्हरसह सर्व प्रवाशांना वाहनातून खाली उतरण्यास सांगा.
  • CNG स्टेशनमध्ये कधीही मोबाइल फोन, माचिस बॉक्स वापरू नये किंवा धूम्रपान करू नये.