scorecardresearch

Volkswagen Recall: ऑडी, पोर्शेने परत मागवल्या ३२ हजार गाड्या, कारण…

फॉक्सवॅगन एजी अंतर्गत येणारे जर्मन लग्जरी कार ब्रांड्स ऑडी आणि पोर्शेने ३२ हजार गाड्या परत मागवल्या आहेत.

Volkswagen Recall: ऑडी, पोर्शेने परत मागवल्या ३२ हजार गाड्या, कारण…
Volkswagen Recall: ऑडी, पोर्शेने परत मागवल्या ३२ हजार गाड्या, कारण… (Photo- Audi)

फॉक्सवॅगन एजी अंतर्गत येणारे जर्मन लग्जरी कार ब्रांड्स ऑडी आणि पोर्शेने ३२ हजार गाड्या परत मागवल्या आहेत. रियर एक्लल एलाइन्मेंटच्या समस्येमुळे गाड्या पुन्हा मागवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. यात सेडान, कूप आणि एसयूव्हीसहित वेगवेगळ्या बॉडी स्टाइलच्या गाड्या आहेत. या गाड्या २०२० आणि २०२१ दरम्यान बनवण्यात आल्या होत्या. यात A5 Sportback, RS5 Coupe, RS5 Sportback, S5 Sportback, A4 Allroad, A4 Sedan, A5 Cabriolet, A5 Coupe, A6 Allroad, A6 Sedan, A7, A8, Q5, S4 Sedan, S5 Coupe, S5 Cabriolet, S6 Sedan, S7, S8, SQ5, 2021 Q5 Sportback, Q7, Q8, RS6 Avant, RS7, RSQ8, SQ5 Sportback, SQ7 आणि SQ8 गाड्यांचा समावेश आहे. तर पोर्शेचं २०२०-२१ केयेन मॉडेल परत मागवलं आहे. रिकॉल अभियानात २०२० आणि २०२१ मध्ये बनवलेल्या जवळजवळ प्रत्येक ऑडी कारचा समावेश आहे. Audi RS5 च्या बाबतीत, काही युनिट्स २०१९ मध्ये बनवण्यात आल्या होत्या.

“प्रभावित कारमध्ये एक नट आहे जो निकामी होऊ शकतो आणि कारचा मागील भाग अचानक एलान्मेंटमधून बाहेर पडू शकतो. मागच्या वेळी गाड्या परत मागवल्या होत्या, तेव्हा एक्सल सस्पेंशन अलाइनमेंट तपासणीचा समावेश नव्हता. यामुळे व्हील एलाइन्मेंटमध्ये डिस्प्लेसमेंट होऊ शकतं. यामुळे टायरची लवकर झिज होई शकते.”, असं ऑडीकडून सांगण्यात आलं आहे.

रेनॉल्टने भारतात ८ लाख विक्रीचा टप्पा ओलांडला, Kwid आणि Triber गाड्यांनी दिली मोलाची साथ

वाहन निर्माता प्रभावित वाहनांच्या मागील एक्सलसाठी सस्पेंशन एलाइन्मेंट तपासेल आणि आवश्यक असल्यास समायोजन करेल. सस्पेंशनच्या संभाव्य चुकीच्या एलाइन्मेंटमुळे टायर्सचे घर्षण तपासेल आणि आवश्यक असल्यास ते बदलेल. या रिकॉलचा एक भाग म्हणून रिइंबर्समेंट योजना सादर करण्याचा दावाही ऑडी करत आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.