Jeep Discount Offers In August 2024 : ऑगस्ट महिना हा सण - उत्सवाचा महिना मानला जातो. या महिन्यात ऑटो कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स घेऊन येतात आणि ग्राहकांना खूश करतात. अशात आता Jeep कंपनी त्याच्या एसयुव्हीवर अनेक चांगले ऑफर देत आहे. कंपनीकडून कोणत्या एसयुव्हीवर किती ऑफर दिल्या जात आहे. याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (August 2024 Jeep Discount Offers on Compass and Meridian and save lakhs of rupees) जीप मेरिडियन (Jeep Meridian) जीप ऑगस्ट महिन्यात एसयुव्ही Meridian लाखो रुपये बचत करण्याची संधी देत आहे. कंपनीकडून या महिन्यात Meridian एसयुव्ही खरेदीवर दोन लाख रुपयांचा फायदा तुम्ही करू शकता. एसयुव्हीवर दोन लाख रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट ऑफर आणि लॉयल्टी ऑफर सुद्धा ग्राहकांना दिले जाणार आहे. या एसयुव्हीच्या टॉप व्हेरिअंट overland ला ३६.९७ लाख रुपयांच्या एक्स शोरुम किंमतीवर खरेदी करू शकता. हेही वाचा : Neeraj Chopra : देशासाठी रौप्य जिंकणाऱ्या नीरज चोप्राचे कार कलेक्शन एकदा बघाच! ‘या’ पाच आलिशान कार पाहून थक्क व्हाल! जीप कंपास (Jeep Compass) जीपकडून आणखी एक एंट्री मॉडेल म्हणून कंपासवर ऑफर दिली जात आहे. या एसयुव्हीची ऑगस्ट २०२४ मध्ये खरेदी करून लाखो रुपयांची बचत करू शकता. Jeep Compass वर कंपनी जास्तीत जास्त २.५० लाख रुपयांचा ऑफर देत आहे. ही बचत कॅश डिस्काउंटवर दिली जाऊ शकते. याशिवाय यावर एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट ऑफर आणि लॉयल्टी ऑफर मिळत आहे. जीपच्या याएयुव्हीला २०.६९ रुपयांच्या एक्स शोरूम किंमतीपासून २६. ६९ लाखापर्यंतच्या एक्स शोरूम किंमतीवर खरेदी करू शकतात. इतर मॉडेल्सवरही करू शकता पैशांची बचत कंपनीकडून फक्त दोनच एसयुव्ही कारवर ऑफर दिली जात नसून याशिवाय कंपनीच्या अन्य एसयुव्हीवर खास व्हेरिअंट्च्या खरेदीवर बचत केली जाऊ शकते. हेही वाचा : Tata Curvv EV देशात दाखल होताच टाटाचा आणखी मोठा धमाका! कंपनीने ‘ही’ घोषणा करताच ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद जीपच्या ग्राहकांना मिळू शकतो फायदा जर कोणाकडे जीप एसयुव्ही असेल तर त्यांना १७ ऑगस्ट पर्यंत आणखी एक ऑफर आहे. लेबर चार्जवर ७.८ टक्के, कार केअर ट्रिटमेंट आणि बॉडी रिपेअरवर ७.८ टक्क्यांची सुट दिली जात आहे.