ऑटो क्षेत्रातील एसयूव्ही सेगमेंटला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. झपाट्याने वाढत असलेली मागणी पाहता अनेक कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये नवीन कार लाँच केल्या आहेत. त्यासोबतच या सेगमेंटच्या गाड्यावर आकर्षक सूट देण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्ही देखील या महिन्यात नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येथे तुम्ही जाणून घेऊ शकता की कोणत्या एसयूव्हीवर तुम्हाला आकर्षक सूट आणि इतर फायदे मिळू शकतात.

Mahindra Alturas G4: महिंद्राची प्रीमियम एसयूव्ही असून या गाडीच्या खरेदीवर २.२ लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. कंपनी या गाडीवर २.२ लाखांपर्यंत रोख सूट देत आहे. कंपनी या एसयूव्हीवर ५० हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, ११५०० रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आणि २० हजार रुपयांपर्यंतच्या अ‍ॅक्सेसरीज देत आहे.

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप

Renault Duster: रेनॉल्ट डस्टर ही कंपनीची एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. या गाडीच्या खरेदीवर तुम्ही १.७० लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. या एसयूव्हीवर ५० हजार रुपयांची रोख सवलत आणि ५० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, ३० हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट, १५ हजार रुपयांचा ग्रामीण बोनस आणि २० हजार रुपयांपर्यंत रुपयांपर्यंतच्या अ‍ॅक्सेसरीज देत आहे.

Maruti Suzuki S Cross: मारुती सुझुकी या एसयूव्हीवर आकर्षक सूट देत आहे. यावर तुम्हाला ६० हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. कंपनी मारुती एस-क्रॉसवर २० हजार रुपयांची रोख सवलत देत आहे. जी Zeta व्हेरियंटवर लागू होईल. याशिवाय इतर व्हेरियंटवर १५ हजार रुपयांची रोख सवलत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी २५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट देखील देत आहे.

गाडीचं इंजिन पाऊस किंवा भेसळयुक्त इंधनामुळे खराब झालं तरी मारुती सुझुकी करणार दुरुस्त, वाचा काय आहे योजना

Tata Harrier: टाटा हॅरियर ही त्यांच्या कंपनीची एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. ही गाडी खरेदी करत असाल तर तुम्हाला ४५ हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. टाटा मोटर्स या एसयूव्हीच्या २०२१ च्या मॉडेलवर २० हजार रुपयांची रोख सवलत आणि २०२२ च्या मॉडेलवर २० रुपयांची सूट देत आहे. याशिवाय कंपनी २०२१ आणि २०२२ या दोन्ही मॉडेल्सवर २० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ५ हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.