scorecardresearch

Auto Expo 2023: यंदाच्या ‘ऑटो एक्स्पो’ ला ‘इतक्या’ चाहत्यांनी केली गर्दी, आकडेवारी पाहून तुमचेही डोळे फिरतील

Auto Expo 2023: यंदाचा ‘ऑटो एक्स्पो’ मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. ‘इतक्या’ वाहनप्रेमींनी लावली होती हजेरी

Auto Expo 2023: यंदाच्या ‘ऑटो एक्स्पो’ ला ‘इतक्या’ चाहत्यांनी केली गर्दी, आकडेवारी पाहून तुमचेही डोळे फिरतील
ऑटो एक्सपोला 6.36 लाख लोकांनी दिली भेट (Photo-financialexpress)

Auto Expo 2023 Visitors: सलग दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर देशात सर्वात मोठा ऑटो शो ‘ऑटो एक्स्पो’ (Auto expo 2023) यंदा ग्रेटर नोएडा येथे मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. ऑटो एक्सपो हा भारतीय वाहन बाजारातला सर्वात मोठा इव्हेंट आहे, जो दर दोन वर्षांनी होतो. हा शो ११ जानेवारीपासून सुरु झाला असून या शो ची सांगता १८ जानेवारी रोजी झाली आहे. या शो मध्ये देश विदेशातील बड्या वाहन कंपन्या सहभागी झाल्या. देशातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकीपासून ते ह्युंदाई, टोयोटा लेक्सस आणि बीवायडी सारख्या वाहन उद्योगातील मोठ्या कंपन्यांनी आपली जबरदस्त वाहने अनवील केले आहेत.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: ऑटो एक्सपोमध्ये दिसला Kia च्या ११ सीटर MPV चा जलवा; आकर्षक लूकची चाहत्यांना भुरळ )

६ लाख ३६ हजार ७४३ लोकांनी ऑटो एक्स्पोला दिली भेट

या ऑटो एक्सपोमध्ये वेगवेगळ्या वाहन निर्मात्या कंपन्यानी त्यांच्या नवीन कार, मोटरसायकल, स्कूटर, कॉन्सेप्ट व्हेईकल्स, कमर्शियल व्हेईकल्स, मोटर वाहनांसबंधीचं नवीन तंत्रज्ञान सादर केले आहेत. यंदाचा ऑटो एक्स्पो यशस्वीरित्या संपला. यंदाच्या ऑटो एक्स्पोने सर्व रेकॉर्ड तोडले, एकूण ६ लाख ३६ हजार ७४३ लोकांनी या ऑटो एक्स्पोला भेट दिली. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे अध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

या ऑटो एक्स्पोमुळे देशात अनेक नवनवीन तंत्रज्ञान दाखल झाले. तसेच भारत आता जपानला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल बाजारपेठ म्हणून उदयास आला आहे. तो आता फक्त अमेरिका आणि चीनच्या मागे आहे.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: लष्करासाठी येतेय मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक SUV; एका चार्जमध्ये मिळेल 500 किमी पेक्षा जास्त रेंज )

‘या’ वाहनांनी वेधले चाहत्यांचे लक्ष

गेल्या ऑटो एक्स्पोमध्ये कंपन्यांकडे योजना आणि तंत्रज्ञान होते ज्याद्वारे केवळ माहिती दिली जात होती. परंतु या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये, अनेक कंपन्यांनी किआ, टाटा, मारुती, होंडा आणि इतर अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांसारख्या त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे नवीन मॉडेल सादर केले. Hyundai ने ioniq5 लाँच केले, Kia ने EV9 कॉम्पॅक्ट SUV लाँच केले, Toyota ने BZ4X मॉडेल लॉन्च केले आणि अनेक कंपन्यांनी Future EV शी संबंधित माहिती दिली. याच टू-व्हीलरमध्ये अनेक कंपन्यांनी त्यांच्या एलएमएल, लिगर आणि अल्ट्राव्हायोलेटसारख्या ईव्ही बाइक्स सादर केल्या, ज्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 15:44 IST

संबंधित बातम्या