Mahindra Thar Vs Maruti Jimny: देशातील सर्वात मोठा ऑटो शो ‘ऑटो एक्स्पो’चा (Auto Expo 2023) आगाज देशात झाला आहे. या शो मध्ये अनेक देश विदेशातील मोठ्या दिग्गज ऑटो कंपन्या आपल्या गाड्या सादर करत आहेत. यातच देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने ऑटो एक्सपो 2023 मध्ये १२ जानेवारी रोजी आपली बहुप्रतिक्षित ‘SUV Maruti Suzuki Jimny 5 door’ लाँच केली आहे. तसेच देशातील दिग्गज कंपनी महिंद्रानेही आपली Mahindra Thar नुकतीच देशात लाँच केली आहे. चला तर जाणून घेऊया Mahindra Thar की Maruti Jimny कोणती असेल तुमच्यासाठी खास.

Maruti Suzuki Jimny ‘अशी’ आहे खास

जिम्नी 5-डोर व्हेरिएंटची लांबी ३,८५० मिमी, रुंदी १,६४५ मिमी आणि उंची १,७३० इतकी मिमी आहे. या एसयूव्हीचा व्हीलबेस २,५५०mm आहे. तर, लांबी आणि व्हीलबेस ३०० मिमीने वाढली आहे. 5 डोअर जिम्नीला सध्याच्या ३ डोअर जिम्नीच्या तुलनेत बॉक्सी आणि रेट्रो इन्स्पायर्ड डिझाइन आहे. याचा व्हीलबेस ३०० मिमी आहे. तसेच, सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत फ्रंट ग्रिल आणि बंपर वेगळ्या डिझाइनमध्ये बनवण्यात आले आहेत.

World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा
how Screaming is good for your health
Screaming : ‘किंचाळणे’ किंवा ‘ओरडणे’ आपल्या आरोग्यासाठी आहे चांगले; घ्या जाणून तज्ज्ञांनी सांगितलेले कारण…
How to Make Cabbage Vada Recipe summer food
चिरलेला कोबी- वाटीभर बेसन, या विकेण्डला घरीच करा कुरकुरीत कोबीचे वडे, चविष्ट रेसिपी-आवडेल सर्वांना
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका

(हे ही वाचा : Auto Expo 2023: एका चार्जवर 631 किमी धावणाऱ्या Hyundai च्या ‘या’ इलेक्ट्रिक SUV ची EV6 पेक्षाही किंमत कमी )

(Photo-financialexpress)

Maruti Suzuki Jimny फीचर्स

मारुती सुझुकीने जिम्नी ५ डोरमध्ये ४ सिलेंडर १.५ लीटर के-१५-बी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १०१ बीएचपी पॉवर आणि १३० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आणि ४ स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येते. तसेच, ४X४ व्हील ड्राइव्ह फीचर देखील मिळते.

Maruti Suzuki Jimny 5door ला LED हेडलाइट्स E. टेल लाइटमध्ये एलईडी लॅम्पही आहेत. या कारमध्ये ७ इंचांची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करेल. यात हिल होल्ड असिस्टंटचेही फीचर आहे.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: मस्तच! दोन वर्ष मोफत करा पुण्याच्या टॉर्क क्रेटॉसच्या ‘या’ इलेक्ट्रिक बाईकचं चार्जिंग; मिळेल जबरदस्त रेंज )

Maruti Suzuki Jimny किंमत

नवीन मारुती जिमनीसाठी अधिकृत बुकिंगही सुरू झाले आहे आणि कंपनी तिच्या प्रीमियम नेक्सा डीलरशिपद्वारे त्याची विक्री करेल. इच्छुक ग्राहक ११,००० रुपयांच्या बुकिंग रकमेसह ही SUV बुक करू शकतात. माहितीनुसार, कंपनी येत्या मे महिन्यापर्यंत ही SUV बाजारात विक्रीसाठी आणू शकते. किंमतीचा विचार करता, असे मानले जाते की त्याची किंमत सुमारे १०.५ लाख रुपयांपासून ते ११ लाख रुपयांपर्यंत असू शकते. महिंद्रा थारची सध्याची किंमत ९.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका! Punch-Harrier केले नवीन अवतारात सादर, १४ ट्रकचाही समावेश, पाहा व्हिडीओ )

2023 महिंद्रा थार: इंजिन आणि गिअरबॉक्स

नवीनतम महिंद्रा थार 4X2 (RWD) मध्ये १.५ लिटर क्षमतेचे नवीन डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ११७ bhp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनसोबत ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. यात २.० लीटर टर्बो पेट्रोल मोटर देखील मिळते. ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर AT मोटरला जोडलेले आहे. महिंद्राच्या थार 4X4 प्रकारात २.२ लिटर क्षमतेचा ऑइल बर्नर आणि २.० लिटर टर्बो पेट्रोल मोटर आहे. तसेच, कंपनीच्या थार 4X4 प्रकारात ६ स्पीड एमटी आणि ६ स्पीड एटी जोडण्यात आले आहेत.

(Photo-financialexpress)

(हे ही वाचा : Auto Expo 2023: ऑटो एक्सपोमध्ये दिसला Kia च्या ११ सीटर MPV चा जलवा; आकर्षक लूकची चाहत्यांना भुरळ )

2023 महिंद्रा थार किमती

Mahindra Thar 4X2 SUV सेगमेंटमध्ये तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. या सर्व प्रकारांच्या किमती (एक्स-शोरूम) ९.९९ लाख रुपयांपासून ते १३.४९ लाख रुपयांपर्यंत सुरू आहेत. ग्राहकांसाठी एक खास गोष्ट आहे. महिंद्राच्या नवीन थार एसयूव्हीच्या या एक्स-शोरूम किमती फक्त पहिल्या १०,००० बुकिंगसाठी लागू आहेत. या नव्या एसयूव्हीचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. नवीन महिंद्राच्या नवीनतम थार 4X2 ची डिलिव्हरी १४ जानेवारी २०२३ म्हणजे आजपासून सुरू होईल.