Tata Sierra EV: ११ जानेवारी ते १८ जानेवारी Auto Expo २०२३ हा इव्हेंट होत आहे. हा इव्हेन्ट उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे होत आहे. १३ तारखेपासून येथे सामान्य नागरिकांना सुद्धा प्रवेश सुरु झाला आहे. यामध्ये अनेक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी कार्स , बाईक्स , बस लाँच केल्या. काहींचे मॉडेल्स हे २०२४ आणि २०२५ मध्ये सुद्धा बाजारात विक्रीसाठी येणार आहेत. यामध्ये टाटा मोटर्सनेसुद्धा आपल्या इलेक्ट्रिक कार्स लाँच केल्या. यामध्ये टाटाने आपली सिएरा ईव्ही एसयूव्ही हे मॉडेल लाँच केले. त्यासोबतच टाटा हॅरिअर इव्ही (Tata Harrier EV), कर्व्ह (Tata Curve ) आणि टाटा अविन्या इव्ही (Tata Avinya EV) देखील लाँच केली.

हेही वाचा : Auto Expo 2023: जबरदस्त पॉवर रेंजसह Ultraviolette ची बाईक घालणार देशात धुमाकूळ; जबरदस्त फीचर्स पाहून व्हाल थक्क)

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

टाटा सिएरा एसयूव्हीमध्ये मोठे एलईडी डीआरएल, मोठे ड्युअल टोन बंपर , स्केअर फॉग लॅम्प , ड्युअल टोन अ‍ॅलॉय व्हील आणि फ्लॅश डोअर हॅन्डल असे फीचर्स आहेत. मागच्या बाजूला मोठा स्पॉयलर, एलईडी टेललाईट्स आणि ड्युअल टोन बंपर असेही फीचर्स येतात. या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या इंटेरिअरबद्दल बोलायचे झाल्यास एसी व्हेंट्स , बॉटम स्टिअरिंग व्हील असून डबल टोन लेआऊटमध्ये मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह डॅशबोर्ड येतो.

हेही वाचा : Auto Expo 2023: टाटा मोटर्सचा धमाका! Punch-Harrier केले नवीन अवतारात सादर, १४ ट्रकचाही समावेश, पाहा व्हिडीओ

टाटा ही गाडी पेट्रोल आणि इलेक्टिक या दोन्ही प्रकारात लाँच करेल. सिएरा इलेक्ट्रिक एसयूव्ही २०२५ पर्यंत बाजारात विक्रीसाठी येईल. कार लाँच करणाऱ्या सिएरा इव्हीबद्दल कोणतीही तांत्रिक आणि अन्य माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. टाटा मोटर्स सध्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ८५ टक्के वाटा भारतीय बाजारपेठेत उचलते आहे. २०३० पर्यंत ५० इलेक्ट्रिक वाहने लाईनअप करण्याचे ध्येय आहे.