Tork KRATOS X: यंदाचा ‘ऑटो एक्स्पो’ इलेक्ट्रिक कार, बाईक, स्कूटरने गाजताना दिसत आहे. त्यात आता भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक मोटरसायकल ब्रँडपैकी एक असलेल्या Tork Motors ने ‘Kratos X’ इलेक्ट्रिक बाईक सादर करुन त्यात आणखी वाढ केली आहे. ही पूर्णपणे नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे, ज्यामध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान आणि डिझाइन वापरण्यात आले आहे. कंपनीने ही बाईक ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर केले असून हे Kratos R ची अद्ययावत आवृत्ती म्हणून प्रदर्शित केले जात आहे, तर कंपनीने मानक Kratos बंद करण्याचीही घोषणा केली आहे.

KRATOS X इलेक्ट्रिक बाईकमध्ये काय आहे खास?

पुण्याची स्टार्टअप कंपनी टॉर्क मोटर्सने खास ईलेक्ट्रीक बाईक दाखविली. या KRATOS X चे स्टायलिश डिझाईन, परफॉर्मन्स आणि कंफर्टसोबतच ही बाईक लवकरच बाजारात लाँच करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. तसेच कंपनी आता मार्च २०२३ पर्यंत आणखी काही भारतीय शहरांमध्ये आपली उपस्थिती वाढणार आहे. सध्या, टॉर्क मोटर्स पुणे, पाटणा, सुरत आणि हैदराबाद येथे सेवा देत आहे. टॉर्क मोटर्सने गेल्या वर्षी भारतात पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच केली होती.

Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
IPL 2024 Ravindra Jadeja Comment on Wife Rivaba Instagram Post Goes Viral
IPL 2024: “माझा हुकूम आहे…” पत्नी रिवाबाच्या पोस्टवरील जडेजाची कमेंट व्हायरल
JSW Group announces partnership with China MG Motor
‘ई-व्ही’ आखाड्यात नवीन स्पर्धक; जेएसडब्ल्यू समूहाची चीनच्या एमजी मोटरशी भागीदारी

(हे ही वाचा : Royal Enfield: तरुणांना वेड लावणारी ‘ही’ बाईक येतेय बाजारात; दमदार फीचर्स अन् डिझाईन पाहून तुम्हीही पडाल प्रेमात )

KRATOS X इलेक्ट्रिक बाईक रेंज

Kratos X इलेक्ट्रिक मोटरसायकलला लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. हे एका चार्जवर १२० किमी, ४ सेकंदात ०-४० किमी/ताशी वेग आणि १०० किमी/ताशी सर्वोच्च गतीसह येते.

(Photo-financialexpress)

(हे ही वाचा : Auto Expo 2023: प्रति किमी खर्च फक्त ८० पैसे, ४५ मिनिटांत चार्ज; अशी आहे, देशातली पहिली सौर ऊर्जेवर चालणारी कार)

KRATOS X इलेक्ट्रिक बाईक वैशिष्ट्ये

Kratos R पेक्षा Kratos X ला एक मोठी बॅटरी मिळते, तर वैशिष्ट्यांमध्ये Android सह ७-इंच टचस्क्रीन आणि अनेक सुरक्षा वैशिष्ट्यांसह नेव्हिगेशन समाविष्ट आहे. एक अ‍ॅल्युमिनियम स्विंगआर्म, त्याच्या बाजूच्या पॅनल्सवर नवीन डिझाइन घटक आणि नवीन फ्युरियस फास्ट रायडिंग मोड देखील आहेत.

(हे ही वाचा : Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोमध्ये ‘या’ वाहनांनी वेधले चाहत्यांचे लक्ष; रेंज, फीचर्स, डिझाईन सर्वकाही एकदम जबरदस्त)

दोन वर्ष मोफत करा चार्जिंग

टॉर्क मोटर्सचे सर्व ग्राहक दोन वर्षांच्या कालावधीसाठी मोफत चार्जिंग नेटवर्कचा लाभ घेऊ शकतात, तसेच जिओ-फेन्सिंग, माझे वाहन शोधा, ट्रॅक मोड, क्रॅश अलर्ट आणि व्हेकेशन मोड यासारख्या वैशिष्ट्यांचा लाभ घेता येणार. एक नवीन पोर्टेबल चार्जरची सेवा बाईकला घरच्या चार्जरप्रमाणे जलद चार्ज करू शकते, तर ई-बाईकला ऍक्सेसरीज म्हणून पॅनियर्स देखील मिळतील. नवीन Kratos X इलेक्ट्रिक बाईकची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.