TVS Ronin Vs Keeway SR 250: क्रूझर बाईक सेगमेंटमध्ये अलीकडेच अनेक बाइक्सची एंट्री झाली आहे ज्यात TVS मोटर्सचे TVS Ronin आणि Keeway द्वारे Keeway SR250 ही दोन प्रमुख नावे आहेत. या दोन्ही बाईक्स रेट्रो डिझाइनसह येतात. आज आम्ही तुम्हाला TVS Ronin आणि Keeway SR250 मधील किंमत, इंजिन, मायलेज, ब्रेकिंग सिस्टम आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत कोणती बाईक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते ही माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया कोणती बाईक असेल तुमच्यासाठी खास.

TVS Ronin

TVS मोटर्सची TVS Ronin ही एकमेव क्रूझर बाईक आहे जी बाजारात चार प्रकारांसह लाँच करण्यात आली आहे. बाईकची सुरुवातीची किंमत १.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि टॉप मॉडेलसाठी किंमत १.७१ लाख रुपये आहे.

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका

हे ही वाचा << Tata Altroz Racer की Hyundai i20 N-Line? कोणती कार आहे सर्वाधिक दमदार, वाचा फीचर्स अन् बरचं काही

TVS Ronin इंजिन

TVS Ronin सिंगल सिलेंडर २२५.९ सीसी ४ स्ट्रोक इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन २०.४ PS पॉवर आणि १९.९३ Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहे.

TVS Ronin मायलेज

TVS Ronin च्या मायलेजबद्दल, TVS Motors दावा करते की, ही बाईक ४२.९५ किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

हे ही वाचा << Auto Expo 2023: मस्तच! दोन वर्ष मोफत करा पुण्याच्या टॉर्क क्रेटॉसच्या ‘या’ इलेक्ट्रिक बाईकचं चार्जिंग; मिळेल जबरदस्त रेंज

TVS Ronin ब्रेकिंग सिस्टम

TVS Ronin च्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. या ब्रेकिंग सिस्टीममध्ये सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम जोडण्यात आली आहे.

TVS Ronin वैशिष्ट्ये

TVS Ronin च्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, या क्रूझर बाईकमध्ये संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, TVS SmartConnect, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल नोटिफिकेशन, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, व्हॉइस आणि राइड असिस्ट, यूएसबी चार्जर, साइड स्टँड चेतावणी, फोन बॅटरी अलर्ट, कमी इंधन अलर्ट आहे. आणि लो स्पीड राइड असिस्ट सारखे फीचर्स जोडले गेले आहेत.

Keeway SR 250

Keeway SR 250 ऑटो एक्सपो 2023 मध्ये Keeway ने लाँच केला आहे, ज्यामध्ये फक्त एक स्टॅन्डर व्हेरियंट बाजारात सादर केला जाईल. या बाईकची किंमत १.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम ) निश्चित करण्यात आली आहे.

हे ही वाचा << Mahindra Thar Vs Maruti Jimny: मारुती जिमनी की महिंद्रा थार? कोणती कार सर्वात भारी? येथे वाचा संपूर्ण माहिती

Keeway SR 250 इंजिन

Keyway SR 250 मध्ये कंपनीने २२३ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे ज्यामध्ये ५ स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहे. हे इंजिन १६.२२ PS ची पॉवर आणि १६ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

Keeway SR 250 मायलेज

Keyway SR 250 च्या मायलेजबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, या बाईकचे मायलेज ४५ ते ५० किलोमीटर प्रति लिटर असू शकते.

हे ही वाचा << Auto Expo 2023: ऑटो एक्सपोमध्ये दिसला Kia च्या ११ सीटर MPV चा जलवा; आकर्षक लूकची चाहत्यांना भुरळ

Keeway SR 250 ब्रेकिंग सिस्टम

ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत, ज्यामध्ये ड्युअल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) देण्यात आले आहे.

Keeway SR 250 वैशिष्ट्ये

कीवे एसआर २५० मध्ये फुल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, गीअर पोझिशन इंडिकेटर, स्पीडोमीटर, टॅकोमीटर, ओडोमीटर, ट्रिप मीटर, लाँग टेल लाईट, एलईडी हेड लाईट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, सर्व एलईडी लाइटिंग सिस्टीम यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.