Kia Sonet Seltos Carens Carnival EV6 February 2023 Sale: गेल्या वर्षभरात नावारुपाला आलेल्या किआ कंपनीने (Kia Motors) भारतीय बाजारपेठेत दमदार कामगिरी करुन दाखविली आहे.  किआ इंडियाने गेल्या महिन्यातील, म्हणजे फेब्रुवारी २०२३ चा कार विक्री अहवाल जाहीर केला आहे. कोरियन कार ब्रँडने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात एकूण २४,६०० कार विकल्या आहेत आणि वार्षिक विक्रीसह ३५.८ टक्के विक्री आहे. तथापि, जानेवारी २०२३ च्या तुलनेत गेल्या महिन्यात किआ कारच्या विक्रीत घट झाली आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये, प्रथम कार सुरू करण्याच्या साडेतीन वर्षांत किआ इंडियाने आतापर्यंत ६.७५ लाख गाड्यांची विक्री केली आहे आणि एकूण १.९ लाख गाड्याही निर्यात केल्या आहेत.

गेल्या महिन्यात किआच्या कारच्या किती युनिट विकल्या?

किआ सॉनेट- ९८३६ युनिट

Paytm Payments Bank
Paytm पेमेंट्स बँकेला आणखी एक दणका! मनी लाँडरिंगप्रकरणी मोठा दंड, अर्थ मंत्रालयाची कारवाई
Tata Punch Car
ऐकलं का…टाटाची ‘ही’ सुरक्षित कार १ लाखाच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करा; किती भरावा लागेल EMI?  
Bitcoin Halving
बिटकॉइन हॉल्व्हिंग म्हणजे काय आणि क्रिप्टोसाठी त्याचा अर्थ काय?
promote electric vehicles in India
भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन प्रस्ताव, कोणता ठरणार फायदेशीर?

किआ सेल्टोस- ८०१२ युनिट

किआ कार्न्स- ६२४८ युनिट

किआ कार्निवल- ५०४ युनिट

(हे ही वाचा : 5 स्टार सुरक्षा रेटिंगसह येणारी देशातील सगळ्यात भारी ७ लाखांची टाटाची कार केवळ ५० हजारात आणा घरी )

अलीकडच्या काळात कार खरेदीकडे भारतीयांचा कल वाढलाय. सध्या अनेक कंपन्या विविध सेग्मेंटमध्ये दमदार गाड्या लाँच करत आहेत. लोक त्यांना पसंतही करत आहेत. भारतीय वाहन बाजारपेठेत किआ कार कंपनी आता लोकप्रिय ठरली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये कंपनीने कार विक्रीत दमदार कामगिरी केली आहे.