लोकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वाढती क्रेझ पाहता ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या नवनवीन कार बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. आता Kia indiaने ही त्यांच्या नवीन ‘Kia EV9’ या इलेक्ट्रिक SUV चा टीझर रिलीज केला आहे. तसेच ही इलेक्ट्रिक SUV लाँच करण्यापूर्वी नवीन वर्षात होणाऱ्या २०२३ ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित केली जाईल. यापूर्वी, Kia Motors ने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक SUV Kia EV6 लॉन्च केली आहे.

Kia EV9 मध्ये काय असेल खास?

‘Kia EV9’ ही इलेक्ट्रिक SUV ४,९२९ एमएम लांब, २,०५५ एमएम रुंद आणि १,७९० एमएम उंचीची इलेक्ट्रिक SUV आहे, ज्याचा व्हीलबेस ३,१०० एमएम आहे. कंपनी ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर ही SUV तयार करत आहे. Kia EV9 या इलेक्ट्रिक SUVच्या किंमतीचा खुलासा अद्याप झालेला नाही. परंतु या इलेक्ट्रिक SUV मध्ये काय संभावित फीचर्स असू शकतात हे जाणून घेऊया.

Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
TCS Recruitment 2024
TCSमध्ये होणार पदवीधर उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख अन् प्रक्रिया
sebi introduced t0 settlement plan for share buying and selling from today
शेअर खरेदी-विक्रीची ऐतिहासिक ‘टी प्लस शून्य’ प्रणाली आजपासून; स्टेट बँक, बजाज ऑटोसह २५ समभागांत एकाच दिवसांत व्यवहारपूर्तता शक्य  
Pavan Davuluri
मायक्रोसॉफ्टची धुरा भारतीय वंशाच्या पवन दावुलुरी यांच्या हाती; जाणून घ्या त्यांची कारकीर्द?

(हे ही वाचा : Cheapest MPVs India: तुम्ही 7 सीटर MPV खरेदीचा विचार करताय, ६ लाखापेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘या’ दमदार कार )

Kia EV9 डिझाईन

Kia EV9 च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर कंपनी यामध्ये फुल LED लाइटिंग वापरणार आहे. याच्या पुढील बाजूस झेड डिझाइन एलईडी हेडलॅम्पसह एक ब्लँक आऊट पॅनल दिले जाईल. याच्या पुढील बाजूस सिग्नेचर टायगर नोज ग्रिल देण्यात आली आहे. याशिवाय नवीन डिझाईनचा बंपर आणि युनिक डिझाइनचा एलईडी टेल लॅम्प जोडण्यात आला आहे.

Kia EV9 वैशिष्ट्ये
वैशिष्ट्यांबद्दल बोलताना, कंपनी EV9 इलेक्ट्रिक SUV मध्ये ट्विन स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्पोक लेस फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, फुल डिजिटल डॅशबोर्ड, अॅम्बियंट लाइटिंग, दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट आणि पुढच्या भागात पूर्णपणे अॅडजस्टेबल सीट्स देणार आहे. याशिवाय हाय-टेक फीचर्स, ओव्हर द एअर सॉफ्टवेअर अपडेट सारखे फीचर्स, मागणीनुसार फीचर्स सुद्धा यात जोडले जाऊ शकतात.

(हे ही वाचा : फक्त ५४ हजारांमध्ये घरी घेऊन जा मारुतीच्या कारसोबत ‘ही’ कार, फीचर्ससोबत मायलेजही आहे जबरदस्त)

Kia EV9 बॅटरी
EV9 इलेक्ट्रिक SUV मध्ये कंपनी ७७.४ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देऊ शकते, ज्यामध्ये होम चार्जर व्यतिरिक्त, जलद चार्जिंगचा पर्याय देखील उपलब्ध असेल. फास्ट चार्जरद्वारे चार्ज केल्यावर ही बॅटरी अवघ्या २० मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, Kia EV9 एका चार्जवर ४५० ते ५०० किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज प्राप्त करण्यास सक्षम असेल. यासोबतच ताशी १५० ते २०० किलोमीटरचा टॉप स्पीड मिळण्याचीही शक्यता आहे.