automobiles maruti celerio 2021 receives over 15000 bookings maruti celerio 2021 waiting period maruti suzuki celerio 2021 mileage features price details prp 93 | Maruti Celerio: नवीन Celerio चं बुकिंग १५,००० च्या पुढे, प्रतीक्षा कालावधी वाढला, देते 26 Kmpl मायलेज | Loksatta

Maruti Celerio: नवीन Celerio चं बुकिंग १५,००० च्या पुढे, प्रतीक्षा कालावधी वाढला, देते 26 Kmpl मायलेज

Maruti Suzuki ने नोव्हेंबर २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात सेलेरियो (Celerio) हॅचबॅक कारची सेकंड जेनरेशन मॉडल लॉंच केली आहे. जाणून घेऊया फिचर्सबाबत…

maruti-celerio-2021
(Image source: Maruti Suzuki India)

देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी Maruti Suzuki ने नोव्हेंबर २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात सेलेरियो (Celerio) हॅचबॅक कारची सेकंड जेनरेशन मॉडल लॉंच केली आहे. या मॉडेलने लॉंचच्या एका महिन्यातच १५,००० हून अधिक बुकिंग मिळवले आहेत. नवीन मॉडेल मागील जनरेशनच्या सेलेरियोच्या तुलनेत खूपच चांगलं आहे. सेलेरिओचे पूर्वीचे मॉडेल दर महिन्याला सुमारे ५,००० ते ६,००० युनिट्स बुक होत असे. सध्या, २०२१ ची नवीन मारुती सेलेरियोच्या वेरिएंटवर अवलंबून १२ आठवडे (सुमारे 3 महिने) प्रतीक्षा कालावधी सुरू आहे.

प्रतीक्षा कालावधी
या मोठ्या प्रतीक्षा कालावधीचं कारण म्हणजे सेमीकंडक्टर चिप्स आणि इलेक्ट्रॉनिक कंपोनेन्ट्स कमतरता हे होय. खरं तर, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात मारुती सुझुकीचे मासिक उत्पादन अनुक्रमे ६० टक्के, ४० टक्के आणि १५ टक्क्यांनी घसरलं आहे. सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे, मारुती सुझुकीच्या कारला दीर्घ प्रतीक्षा कालावधीचा सामना करावा लागत आहे आणि सुमारे २.५०,००० ऑर्डर ऑटोमेकरकडे प्रलंबित आहेत. पेट्रोल मॉडेलसाठी प्रतीक्षा कालावधी ९ ते १२ आठवडे चालू असताना, सीएनजी मॉडेलसाठी प्रतीक्षा कालावधी १७ ते १८ आठवड्यांपर्यंत आहे.

किंमत किती आहे?
नवीन 2021 मारुती सेलेरियो चार ट्रिम्स (LXi, VXi, ZXi आणि ZXi+) आणि सात व्हेरिएंटमध्ये (4 मॅन्युअल आणि 3 AMT) येते. LXi, VXi, ZXi आणि ZXi+ मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे रु. ४.९९ लाख, रु. ५.६३ लाख, रु. ५.९४ लाख आणि रु. ६.४४ लाख आहे. VXi, ZXi आणि ZXi+ AMT व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे ६.१३ लाख, ६.४४ लाख आणि ६.९४ लाख रुपये आहे. वरील सर्व किंमती एक्स-शोरूममधील आहेत.

व्हेरिएंटकिंमत (रुपये)
LXI MT४.९९ लाख
VXI MT५.६३ लाख
VXI AMT ६.१३ लाख
ZXI MT५.९४ लाख
ZXI AMT६.४४ लाख
ZXI+ MT ६.४४ लाख
ZXI+ AMT ६.९४ लाख

आणखी वाचा : कन्फर्म ! भारतात ‘या’ तारखेला लॉंच होणार Mini ची पहिली इलेक्ट्रिक कार Cooper SE, जाणून घ्या फिचर्स

इंजिन आणि पॉवर
मारुती सुझुकी सेलेरियोमध्ये आता नेक्स्ट जेनरेशन K10 1.0-लिटर 3-सिलेंडर इंजिनचा वापर करण्यात आलाय. मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स दोन्ही पर्यायांसह हे इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 49 Kw (66 hp) पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीने असाही दावा केला आहे की नवीन इंजिन सर्व व्हेरिएंटमध्ये १९ टक्क्यांपर्यंत CO2 उत्सर्जन कमी करण्यास सक्षम आहे. यात थंड EGR, ऑटो टेंशनर आणि इंटिग्रेटेड एक्झॉस्ट मॅनिफोल्ड देण्यात आले आहेत.

जास्तीत जास्त मायलेज
कंपनीचा दावा आहे की, नवीन मॉडेल Celerio च्या आधीच्या मॉडेलपेक्षा २३ टक्के जास्त मायलेज देते. नवीन Celerio 26.68 kmpl च्या मायलेजसह देशातील सर्वात इंधन-कार्यक्षम पेट्रोल कार असल्याचा दावा करते.

आणखी वाचा : Flying Car: आता ट्रॅफिक जॅमला करा बाय बाय! या कंपनीने खरोखर बनवली हवेत उडणारी कार…

आधीपेक्षा आकाराने मोठी
नवीन मारुती सुझुकी सेलेरिओ आता मॉड्यूलर हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित आहे जी मारुती तिच्या इतर हॅचबॅक वॅगनआर, स्विफ्ट आणि बलेनोमध्ये आहे. नवीन Celerio त्याच्या मागील मॉडेलपेक्षा मोठी आहे आणि त्याची लांबी ३,६९५ मिमी, रुंदी १,६५५ मिमी, उंची १,५५५ मिमी आणि व्हीलबेसमध्ये २,४३२ मिमी आहे. त्याची लांबी आणि उंची आउटगोइंग मॉडेल सारखीच आहे, परंतु नवीन मॉडेल ५५ मिमी रुंद आहे तर व्हीलबेस १० मिमी लांब आहे. नवीन Celerio चे ग्राउंड क्लीयरन्स १७० mm आहे, जे पूर्वीपेक्षा ५ mm जास्त आहे.

नवीन रूप, डिझाइन आणि रंग
डिझाइनच्या बाबतीतही नवीन सेलेरियो जुन्या मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. फर्स्ट-जेन सेलेरिओची स्क्वॅरीश आणि कोनीय रचना गुळगुळीत प्रवाही वक्र आणि अधिक गोलाकार डिझाइनसह बदलली आहे. कारचा पुढचा भाग ओव्हल दिसणार्‍या हेडलँपने ओळखला जातो, ज्यांना नवीन डिझाइन केलेल्या ग्रिलमध्ये क्रोम स्ट्राइप देण्यात आली आहे. ब्लॅक कॉन्ट्रास्ट ट्रिम आणि गोलाकार फॉग लॅम्प्ससह समोरचा बंपर चांगला सजवला आहे.

आणखी वाचा : Maruti Suzuki Year-End Discounts: स्वस्तात कार! मारुती सुझुकी देत ​​आहे ४८ हजार रुपयांपर्यंत सूट; या वाहनांवर मिळणार सूट

प्रोफाइलमध्ये, नवीन सेलेरियोला बॉडी कलर्ड विंग आणि लिफ्ट-टाइप डोअर हँडल मिळतात, जे आउटगोइंग मॉडेलवर दिसणार्‍या पुल-टाइपपेक्षा वेगळे आहेत. यात एक मोठे ग्लास हाउस आणि एक सडपातळ रूफलाइन देखील आहे. विशेष म्हणजे, नवीन सेलेरियोच्या उच्च व्हेरिएंटमध्ये गडद १५-इंच अलॉय व्हील आहेत. रियर प्रोफाइल तुलनेने सोपी आहे, गोलाकार टेल-लॅम्प आणि चांगले कंटूर केलेले बंपर. मारुती सेलेरियो ६ मोनोटोन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये आर्क्टिक व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्लिस्टेनिंग ग्रे, सॉलिड फायर रेड, स्पीडी ब्लू आणि कॅफिन ब्राउन यांचा समावेश आहे.

इंटेरिअर आणि फीचर्स
Celerio आता पूर्वीपेक्षा अधिक जागा देण्याचे वचन देते. ही कार फर्स्ट-इन-सेगमेंट हिल होल्ड असिस्ट, इंजिन स्टार्ट-स्टॉप, मोठ्या टॅबसारखी इन्फोटेनमेंट स्क्रीन यासारख्या नवीन वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. कारला शार्प डॅश लाइन्स, क्रोम अॅक्सेंटसह ट्विन-स्लॉट एसी व्हेंट्स, नवीन गीअर शिफ्ट डिझाइन आणि अपहोल्स्ट्रीसाठी नवीन डिझाइन आहे. 7-इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ डिस्प्ले Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करतो. सीट आणि अपहोल्स्ट्री बेसिक आहे.

आणखी वाचा : Driverless Car: भारतात धावणार ड्रायव्हरलेस कार, मुंबईतली कंपनी पुढच्या वर्षी करणार लॉंच

सेफ्टी फीचर्स
नवीन मारुती सुझुकी सेलेरियोच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचं झाल्यास, यात ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि ब्रेक असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स, स्पीड सेन्सिटिव्ह डोअर लॉक आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटसाठी हिल होल्ड असिस्ट यांचा समावेश आहे. एकूणच, नवीन Celerio 12 पेक्षा जास्त सुरक्षा वैशिष्ट्य देण्यात आले आहेत. मारुती सुझुकीचा दावा आहे की, नवीन सेलेरियो सर्व भारतीय सुरक्षा नियमांचे पालन करते जसे की फ्रंटल ऑफसेट, साइड क्रॅश आणि पादचारी संरक्षण.

स्पर्धा
2021 Maruti Celerio भारतीय कार बाजारपेठेतील एंट्री-लेव्हल हॅचबॅक सेगमेंटमध्ये Renault Kwid, Hyundai Santro आणि Tata Tiago यांच्याशी स्पर्धा करेल.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2021 at 19:12 IST
Next Story
कन्फर्म ! भारतात ‘या’ तारखेला लॉंच होणार Mini ची पहिली इलेक्ट्रिक कार Cooper SE, जाणून घ्या फिचर्स