automobiles mini cooper se electric car launch date in india 2022 mini cooper se electric range electric vehicles in india prp 93 | कन्फर्म ! भारतात 'या' तारखेला लॉंच होणार Mini ची पहिली इलेक्ट्रिक कार Cooper SE, जाणून घ्या फिचर्स | Loksatta

कन्फर्म ! भारतात ‘या’ तारखेला लॉंच होणार Mini ची पहिली इलेक्ट्रिक कार Cooper SE, जाणून घ्या फिचर्स

मिनी इंडियाने या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या नवीन कूपर इलेक्ट्रिक SE चा टीझर शेअर केला. कंपनीने ऑक्टोबर २०२१ च्या शेवटी १ लाख रुपयांच्या टोकन रकमेमध्ये या कारसाठी प्री-बुकिंग देखील सुरू केली. जाणून घ्या फिचर्स…

MINI-Cooper-SE-Electric

मिनी इंडियाने या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आपल्या नवीन कूपर इलेक्ट्रिक SE चा टीझर शेअर केला. कंपनीने ऑक्टोबर २०२१ च्या शेवटी १ लाख रुपयांच्या टोकन रकमेमध्ये या कारसाठी प्री-बुकिंग देखील सुरू केली होती. या घोषणेनंतर लगेचच या कारच्या ३० युनिट्सची पहिली बॅच काही तासांमध्येच पूर्णपणे बुक झाली. आता कंपनीने अधिकृतरित्या घोषणा केली आहे की, नवीन Cooper SE भारतात मार्च २०२२ मध्ये लॉंच करण्यात येणार आहे.

श्रेणी आणि गती
नावाप्रमाणेच नवीन कूपर इलेक्ट्रिक SE हे इंटरनल कंब्शन इंजन (ICE) असलेल्या मॉडेलची इलेक्ट्रिक वर्जन आहे. ही कार 32.6kWh बॅटरी पॅक असणार आहे जी 181 bhp पॉवर आणि 270 Nm टॉर्क जनरेट करेल, असा दावा केला जातो. याचा बॅटरी पॅक एकदा पूर्ण चार्ज केला की सुमारे 270 किमीची ड्रायव्हिंग रेंज मिळते. कंपनीचा दावा आहे की, ही कार फक्त 7.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.

आणखी वाचा : Flying Car: आता ट्रॅफिक जॅमला करा बाय बाय! या कंपनीने खरोखर बनवली हवेत उडणारी कार…

बॅटरी आणि चार्जिंग
नवीन कूपर इलेक्ट्रिक एसई 11kW चार्जर आणि 50kW चार्जरसह चार्ज करता येऊ शकते. 11kW च्या चार्जरसह कारची बॅटरी 0 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 2.5 तास लागतात. तर 50kW चा चार्जर द्वारे 35 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज करता येते.

आणखी वाचा : Maruti Suzuki Year-End Discounts: स्वस्तात कार! मारुती सुझुकी देत ​​आहे ४८ हजार रुपयांपर्यंत सूट; या वाहनांवर मिळणार सूट

मिनीची पहिली EV
लक्झरी कार सेगमेंटमध्ये Zero-Emissions Product शोधत असलेल्या खरेदीदारांसाठी, कंपनी एक उत्तम पर्याय म्हणून इलेक्ट्रिक मिनी प्रोजेक्ट लॉंच करत आहे. BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावह म्हणाले, “MINI च्या पहिल्या इलेक्ट्रिक कारसह, MINI पुन्हा एकदा अर्बन मोबिलिटीमध्ये आघाडीवर येत आहे.”

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-12-2021 at 18:10 IST
Next Story
Petrol- Diesel Price Today: महाराष्ट्रात पेट्रोलचे दर शंभरी पार तर, डिझेलचे भाव तुलनेने कमी; जाणून घ्या इंधनाचे दर