इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक टू व्हिलर सेगमेंटमध्ये झपाट्याने विक्री होताना दिसत आहे. मुख्यत्वे या इलेक्ट्रिक दुचाकींच्या लांब पल्ल्यामुळे अतिशय कमी किमतीत मोठी रेंज मिळते हे एक कारण होय. तसंच प्रदूषणाशिवाय चालणाऱ्या या इलेक्ट्रिक स्कूटर्स लोकांना खूप आवडतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्‍ही लाँग रेंजची इलेक्ट्रिक स्‍कूटर खरेदी करण्‍याचा विचार करत असाल, तर आकर्षक डिझाईन आणि मोठ्या मायलेजसह या इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमधली एक स्‍कूटरचा तुम्ही विचार करू शकता जी आकर्षक डिझाईनसोबत मोठी मायलेज सुद्धा देते. संपूर्ण माहिती येथे जाणून घेऊ शकता.

आम्ही इलेक्ट्रिक टू व्हीलर मेकर कंपनी Avera ची इलेक्ट्रिक स्कूटर Avera Retrosa बद्दल बोलत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज आणि बॅटरी पॅक व्यतिरिक्त फीचर्सची संपूर्ण माहिती मिळेल.

स्कूटरच्या बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलताना, कंपनीने 3000W पॉवर मोटरसह 3.4 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे जो BLDC तंत्रज्ञानावर आधारित आहे. या बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर हा बॅटरी पॅक ३ ते ४ तासांत पूर्ण चार्ज होतो.

आणखी वाचा : Toyota ने सादर केली Camry Nightshade Special Edition, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

स्कूटरच्या रेंजबद्दल कंपनीचा दावा आहे की एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर १४० किमीची रेंज देते. या रेंजमुळे ताशी ९० किलोमीटरचा वेग मिळण्याचा दावाही कंपनीने केला आहे.

स्कूटरच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने त्याच्या पुढच्या चाकामध्ये आणि मागील चाकामध्ये डिस्क ब्रेक लावले आहेत, ज्यामध्ये अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर पुश बटन स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, ओडोमीटर, डिजिटल फ्युएल गेज, थ्री रायडिंग मोड, एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाईट, टर्न सिग्नल लॅम्प, लो बॅटरी इंडिकेटर यांसारखी फिचर्स देण्यात आली आहेत.

स्कूटरच्या डायमेंशनबद्दल सांगायचे झाले तर, कंपनीने ती ७०० मिमी रुंद, १८७५ मिमी लांबी, ११४० मिमी उंची आणि या स्कूटरचे एकूण वजन १८० किलो आहे.

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने याला १.२८ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह बाजारात लॉन्च केले आहे. या स्कूटरची ही सुरूवातीची किंमतच तिची ऑन-रोड प्राईज आहे.

More Stories onऑटोAuto
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avera retrosa electric scooter gives range of 140 km in single charge read full details of price and features prp
First published on: 19-05-2022 at 17:40 IST