Bajaj Auto’s Pulsar NS400Z : देशातील दुचाकी उत्पादक कंपनी बजाज नवनवीन दुचाकी लाँच करत असते. बजाजच्या दुचाकीवर नेहमीच सर्वांचे लक्ष वेधलेले असते आता बजाजनी पल्सर NS400Z ची नवीन दुचाकी लाँच केली आहे. कंपनीने दुचाकी बुकींग सेवा सुरू केली असून ग्राहक बजाजच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त पाच हजार रुपयांमध्ये ही दुचाकी बुक करू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दमदार पल्सरमध्ये कोणते नवीन फीचर्स आहेत आणि या दुचाकीची किंमत किती आहे? आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

जाणून घ्या फीचर्स

बजाजची ही नवी पल्सर ४०० सीसी ची असून त्यात चार रंगांचा पर्याय दिला आहे. या दुचाकीमध्ये फूल कलर एलसीडी डिस्प्ले आणि ब्लुटूथ कनेक्टिव्हीटी सारखे उत्तम फिचर्स आहेत.

बजाज पल्सर NS400Z च्या इंजिन पॉवरट्रेनमध्ये डोमिनार ४०० सारखा एक ३७३ सीसी, लिक्विड -कूल, सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल जो ८,८०० आरपीएम वर ३९. ४ बीएपीचा पावर आणि ६,५००० आरपीएमवर ३५ एनएमचा टॉर्क निर्माण करतो याला हाय स्पीड गिअरबॉक्स आणि एक असिस्ट व स्लीपर क्लचबरोबर जोडले आहे. या दुचाकीचे फीचर्स पाहून कोणीही थक्क होईल.

हेही वाचा : ऐकलं का…महिंद्राची नवी कोरी सुरक्षित SUV कार १.५ लाखाच्या डाऊन पेमेंटवर खरेदी करा; किती भरावा लागेल EMI?  

या पल्सरची डिझाइन NS200 च्या डिझाइनप्रमाणेचआहे. याची हेडलाइट्स मोठी असून याचे डिआरएल आणि एलईडी प्रोजेक्ट लाइट अतिशय आकर्षित दिसतात.

या पल्सरमध्ये तुम्हाला एलईडी लाइट्स, स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल आणि चार राइड मोड रोड, रेन, स्पोर्ट आणि ऑफ रोड दिसेल. यामध्ये क्लस्टर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी बरोबर एक नवी डिजिटल एलसीडी यूनिट मिळेल.याला अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये कनेक्ट केले जाऊ शकते. या दुचाकीच्या डिस्प्लेमध्ये कॉल, मिस्ड कॉल आणि मेसेज नोटिफीकेशनची माहिती दिसून येईल. हे फीचर्स या दुचाकीला इतर बजाजच्या दुचाकीपेक्षा हटके ठरवते.

हेही वाचा : मारुती, टाटा अन् ह्युंदाईला फुटला घाम, महिंद्राची ५ सीटर कार आता ७ सीटर पर्यायात पाच रंगात देशात दाखल, किंमत…

जाणून घ्या किंमत

या बजाज पल्सर NS400 ची किंमत १.८५ लाख रुपये आहे. ही बजाजच्या डोमिनार ४०० पेक्षा ४६,००० रुपयांनी स्वस्त आहे. ही कंपनीची सुरुवातीची किंमत आहे. त्यामुळे पुढे ही किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे.