Bajaj Avenger 220 Street Finance Plan: बजाज ऑटोने क्रूझर सेगमेंटमध्ये एक नवीन बाईक देशात दाखल केली आहे, या बाईकचे नाव ‘Bajaj Avenger 220 Street’ आहे. ही बाईक काही खास बदल आणि अपडेट्ससह लाँच करण्यात आली आहे. तुम्हाला ही बाईक आवडेल. आता तुम्हाला ही बाईक घ्यायची असेल तर ही बातमी पूर्ण वाचा, कारण आम्ही तुम्हाला त्यावर उपलब्ध असलेल्या फायनान्स प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

‘Bajaj Avenger 220 Street’ किंमत

बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने याची सुरुवातीची किंमत १,४२,०२९ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह लाँच केली आहे. ऑन-रोड, त्याची किंमत १,६४,४६९ रुपये असेल. कंपनीने ते फक्त एकाच प्रकारात लाँच केले आहे. आता जर तुम्ही ही बाईक विकत घेण्यासाठी गेलात तर तुमच्याकडे जवळपास १.६५ लाख रुपये असावेत. तथापि, फायनान्स प्लॅनद्वारे, तुम्ही ते अगदी कमी किमतीत खरेदी करू शकाल.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…
loksatta analysis midcap and smallcap stocks surged
विश्लेषण: सरत्या वर्षात शेअर बाजारात तेजीच तेजी… ‘स्मॉल कॅप’ ठरले छोटे उस्ताद! तेजीचे आणखी कोण भागीदार?

(हे ही वाचा : Honda CB 200X चा खेळ संपणार? हिरोने देशात दाखल केली हायटेक फीचर्सचा भरणा असलेली नवी बाईक, किंमत…)

‘Bajaj Avenger 220 Street’ फायनान्स प्लॅन

ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, प्रथम तुम्हाला बँकेकडून १,४४,४६९ रुपयांचे कर्ज दिले जाईल. बाईक घेण्यापूर्वी २० हजार डाऊन पेमेंट भरावे लागेल. यानंतर, उर्वरित रकमेची परतफेड करण्यासाठी तुम्हाला दरमहा ४,६४१ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

हप्त्याची परतफेड करण्यासाठी तुम्हाला ३ वर्षे म्हणजेच ३६ महिने दिले जातील. त्याच वेळी, कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.७ टक्के दराने व्याज भरावे लागेल.

‘Bajaj Avenger 220 Street’ फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

कंपनीने c बाईकमध्ये २२० सीसी सिंगल सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन १९.०३ पीएस पॉवर आणि १७.५५ Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिनसोबत ५ स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक ४० किमी मायलेज देते आणि मायलेज ARAI प्रमाणित आहे.