scorecardresearch

Bajaj Avenger Street 160 vs Suzuki Intruder: किंमत, स्टाइल आणि मायलेज बघा, गाडी खरेदी करण्यास होईल मदत

देशातील दुचाकी क्षेत्रातील क्रूझर बाइक हा एक छोटा परंतु प्रीमियम सेगमेंट आहे. या बाइक्सना त्यांच्या प्रीमियम डिझाइन आणि इंजिन पॉवरसाठी प्राधान्य दिले जाते.

Bajaj-Avenger-Street-160-vs-Suzuki-Intruder
Bajaj Avenger Street 160 vs Suzuki Intruder: किंमत, स्टाइल आणि मायलेज बघा, गाडी खरेदी करण्यास होईल मदत (फोटो- SUZUKI, BAJAJ)

देशातील दुचाकी क्षेत्रातील क्रूझर बाइक हा एक छोटा परंतु प्रीमियम सेगमेंट आहे. या बाइक्सना त्यांच्या प्रीमियम डिझाइन आणि इंजिन पॉवरसाठी प्राधान्य दिले जाते. तुम्हालाही आकर्षक डिझाईन आणि लांब मायलेज असलेली क्रूझर बाइक घ्यायची असेल, तर तुम्ही या विभागातील दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. या तुलनेत, आज आमच्याकडे Bajaj Avenger Street 160 आणि Suzuki Intruder आहेत, ज्यामध्ये तुम्हाला या दोन्ही बाइकच्या किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत संपूर्ण तपशील जाणून घेता येतील.

Bajaj Avenger Street 160: बजाज एव्हेंजर स्ट्रीट 160 ही एक हलक्या वजनाची क्रूझर बाइक आहे जी फक्त एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आली आहे. या बाइकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यात १६० सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे. जे फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे, हे इंजिन १५ पीएस पॉवर आणि १३.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि हे इंजिन ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाइकच्या ब्रेकिंग सिस्टीममध्ये पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक देण्यात आला आहे, ज्यामध्ये सिंगल चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. बाइकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक ४७.२ किलोमीटर प्रति लिटर एवढा मायलेज असून ARAI ने प्रमाणित केले आहे. बजाज एव्हेंजर स्ट्रीट 160 ची सुरुवातीची किंमत १.०८ लाख रुपये आहे.

Kia Carens: कियाची कॅरेन्स गाडी भारतात लाँच, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Suzuki Intruder: सुजुकी इंट्रूडर ही एक प्रीमियम डिझाईन केलेली बाइक असून कंपनीने फक्त एकाच प्रकारात लाँच केली आहे. बाइकच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने १५५ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे एअर-कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १३.६ पीएस पॉवर आणि १३.८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ज्यामध्ये ५-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागच्या चाकामध्ये ड्रम ब्रेक दिले आहेत. ज्यामध्ये सिंगल चॅनल एबीएस सिस्टम बसवण्यात आली आहे. बाइकच्या मायलेजबद्दल सुझुकीचा दावा आहे की, ही बाईक ४९ किमी प्रति लिटर मायलेज देते आणि ARAI ने प्रमाणित केले आहे. सुजुकी इंट्रूडर बाइकची सुरुवातीची किंमत १.२७ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bajaj avenger street 160 vs suzuki intruder know price feature and mileage rmt