scorecardresearch

नवे फीचर्स, टेक्नॉलॉजीवाल्या ‘या’ बाईकची Hero, Honda वर मात, किंमत ७० हजारांपेक्षाही कमी, मायलेज ७० किमी

कंपनीची ही आकर्षक दिसणारी बाईक लोकांना त्याचे मजबूत इंजिन आणि जास्त मायलेजमुळे आवडते.

Bajaj CT 110X
Bajaj CT 110X बाईक उत्तम पर्याय (Photo-financialexpress)

Bajaj CT 110X Price and Features: देशातील आघाडीची दुचाकी कंपनी बजाज बाजारात वेगवेगळ्या किमतीच्या बाईक विकते. कंपनीची बजाज पल्सर मालिका ग्राहकांना खूप आवडते. पण जर तुम्ही स्वस्त आणि उत्तम मायलेज देणारी बाईक शोधत असाल तर कंपनीकडे तोही पर्याय आहे. बजाज बाजारात स्वस्त बाईक ७० हजारांपेक्षा कमी किमतीत विकते, ज्यामुळे ७०kmpl पर्यंत मायलेज मिळते. ‘Bajaj CT 110X’ असे या बाईकचे नाव आहे.

कशी खास ‘ही’ बाईक?

ही कंपनीच्या सर्वात स्वस्त बाईक्सपैकी एक आहे. Bajaj CT 110X फक्त एकाच प्रकारात येतो. त्याची किंमत ६७,३२२ रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. मॅट वाइल्ड ग्रीन, इबोनी ब्लॅक-रेड आणि इबोनी ब्लॅक-ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ही बाईक उपलब्ध आहे. बजाज CT 110X ची स्पर्धा TVS Radeon, TVS Sport, Hero HF Deluxe आणि Hero Splendor Plus सारख्या बाईक्सशी आहे.

(हे ही वाचा: भारतात २२ वर्षांपासून ‘ही’ ७ सीटर SUV जिंकतेय ग्राहकांचं मन, ‘या’ कारणामुळे आकर्षित झाले कस्टमर)

डिझाइनच्या बाबतीत, बजाज CT 110X ला ब्रेस्ड हँडलबार, क्रॅश गार्ड, मेटल बेली पॅन, हेडलाइट गार्ड, रबर टँक पॅड, दोन्ही बाजूंना फ्लॅट फूट रेस्ट, इंटिग्रेटेड पिलियन ग्रॅब रेलसह टेल रॅक मिळतात. बाईक ट्विन पॉड अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टरने सुसज्ज आहे, ज्यापैकी एकामध्ये स्पीडोमीटर आहे आणि दुसऱ्यामध्ये इंधन गेज आहे.

या बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक कार्बोरेटरसह ११५.४५cc एअर-कूल्ड इंजिन आहे. हे ७०००rpm वर ८.६PS आणि ५०००rpm वर ९.८१Nm जनरेट करते. इंजिन ४-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्याचा टॉप स्पीड ताशी ९० किमी आहे. यात अँटी स्किड ब्रेकिंगसह ड्रम ब्रेक आहेत.

बाईकचे कर्ब वजन १२७kg, ग्राउंड क्लीयरन्स १७० mm आणि ११-लिटरची इंधन टाकी आहे. याला इंजिन संरक्षणासाठी गोलाकार बेली पॅन मिळतो. बाईकमध्ये असे टायर देण्यात आले आहेत, जे अवघड रस्त्यावर सहज धावू शकतात.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 18:32 IST

संबंधित बातम्या