काही दिवसांपूर्वीच बजाजने एन्ट्रीलेव्हल सेगमेंटमध्ये नवीन पल्सर १२५ कार्बन फायबर एडिशन बाईक लाँच केली होते. या नंतर कंपनीने ग्राहकांसाठी नवीन पिढीची Bajaj pulsar p 150 लाँच केली आहे. या बहुप्रतीक्षित बाईकची किंमत १.१६ लाखांपासून (एक्स शोरूम) सुरू होते. ही बाईक कोलकातामध्ये लाँच करण्यात आली. येत्या काही आठवड्यांमध्ये ती देशातील इतर शहरांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बजाज प्लसर पी १५० बाईक ५ रंग पर्यायांसह उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये रेसिंग रेड, कॅरिबियन ब्ल्यू, इबोनी ब्लकॅ रेड, इबोनी ब्लॅक ब्ल्यू आणि इबोनी ब्लॅक व्हाइट या रंगांचा समावेश आहे. बाईकचे सिंगल डिस्क व्हेरिएंट सिंगल सीटसह, तर डबल डिस्क व्हेरिएंट स्प्लिट सीटसह मिळत आहे. स्प्लिट सीट डबल डिस्क असलेली बाईक अधिक स्पोर्टी दिसून येते.

(INNOVA VIDEO: लाँच होण्यापूर्वीच पाहा नवीन इनोव्हा, सनरूफसह दिसते भन्नाट, व्हिडिओतून जाणून घ्या फीचर्स)

नव्या डिजाईनमुळे बाईकला तीक्ष्ण लूक मिळाला आहे. ती हल्की आणि स्पोर्टिअर दिसून येते. बाईकच्या मस्क्युलर फ्युअल टँकमुळे ती दमदार दिसून येते. सीटची उंची ७९० एमएम आहे ज्यावर बसणे अनेकांसाठी सोयिस्कर आहे. बाईकचे एक्झॉस्ट इंजिन आणि मागील टायरच्या मधात आहे. बाईकमध्ये स्टँडर्ड सिंगल चॅनल एबीएसही मिळत आहे.

हे आहेत फीचर्स

बाईकमध्ये १४९.६८ सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन १४.५ पीएसची शक्ती आणि १३.५ एनएमचा टॉर्क निर्माण करते. फीचरच्या बाबतीत बोलायचे झाले तर, बाईकमध्ये डीटीई, फ्युअल इकोनॉमी, क्लॉक, गेअर इंडिकेटरसह इन्फिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. बाईकमध्ये एलईडी टेल लॅम्प आणि एलईडी प्रोजेक्टर हेड लॅम्प मिळत आहे. मोबाईल चार्ज करण्यासाठी बाईकमध्ये यूएसबी सॉकेट देण्यात आला आहे.

(‘या’ दिवशी लाँच होणार PRAVAIG ELECTRIC SUV; ५०४ किमी रेंज, ११ रंग पर्यायांसह होणार उपलब्ध, ही आहे टॉप स्पीड)

किंमत

बाईकच्या सिंगल डिस्क व्हेरिएंटची किंमत १.१६ लाखांपासून (एक्स शोरूम) सुरू होते, तर ट्विन डिस्क व्हेरिएंटची किंमत १.१९ लाखांपासून सुरू होते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj pulsar p 150 launched in india check price and features ssb
First published on: 23-11-2022 at 10:10 IST