बजाज नव्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी सज्ज; Ola S1, TVS iQube शी असणार स्पर्धा

भारतीय दुचाकी उत्पादक कंपनी बजाज मोटर्स लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे.

E_Scooter
बजाज चेतक (प्रातिनिधीक फोटो)

भारतात गेल्या काही दिवसात एक एक करत अनेक इलेक्ट्रिक स्कूटरचं लॉन्चिंग झालं आहे. आता भारतीय दुचाकी उत्पादक कंपनी बजाज मोटर्स लवकरच एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे. नुकतीच या इलेक्ट्रिक स्कूटरची पुण्यातील रस्त्यांवर चाचणी करण्यात आली. कंपनीने यापूर्वी गेल्या वर्षी आपल्या प्रसिद्ध स्कूटर चेतकचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च केले होते. एका रिपोर्टनुसार कंपनीची नवीन स्कूटर चेतक इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा स्वस्त असेल. तसेच, ओला इलेक्ट्रिकच्या S1 आणि S1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरशी स्पर्धा करेल. ट्रेडमार्कच्या अहवालानुसार, या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव Bajaj Fluir किंवा Fluor असू शकते.

नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत १ लाख रुपयांच्या आत असण्याची अपेक्षा आहे. जेणेकरून ती सर्व श्रेणीतील ग्राहकांना आकर्षित करू शकेल. इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

Ather 450X: सिंगल चार्ज केल्यानंतर ई-स्कूटर चालते ११६ किमी; जाणून घ्या वैशिष्ट्ये

बजाजच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची डिझाइन चेतक इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा वेगळी असेल. कॉम्पॅक्ट रिअर प्रोफाइलमध्ये टेल-लॅम्प आणि मागील टर्न इंडिकेटर असेल. तसेच स्विंगआर्मवर मागील बंपर प्लेट बसवण्यात आली आहे. स्विंगआर्म चेतकशी जुळत असल्याचे दिसते. बॅटरी रेंज चांगली असेल, जेणेकरून लोक ओला किंवा इतर कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा तिला प्राधान्य देऊ शकतील. इलेक्ट्रिक स्कूटर पुढील वर्षाच्या सुरुवातीला दाखल होण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bajaj ready for new electric scooter rmt

ताज्या बातम्या