Premium

बजाज-ट्रायम्फच्या नव्या 400cc बाईक्स ‘या’ दिवशी होणार लॉन्च; रॉयल एनफिल्डच्या अनेक बाईक्सना देणार टक्कर, वाचा सविस्तर

Roadster आणि Scrambler या नव्या दोन 400cc बाईक्सबद्दल लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे.

bajaj triumph 400cc bikes
Bajaj triumph 400cc bikes (फोटो सौजन्य – Triumph Website)

बजाज-ट्रायम्फ यांच्या नव्या बाईक्स भारतामध्ये लॉन्च होणार असल्याची माहिती समोर आली आहे. Autocarindia.com ने दिलेल्या माहितीनुसार, Bajaj-Triumph 400cc बाईक्स लवकरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पदार्पण करणार आहेत. काही दिवसांपूर्वी, या दोन्ही बाईक्सच्या ग्लोबल लॉन्चची घोषणा करण्यात आली होती. या घटनेनंतर एक आठवडा उलटला आहे. नुकतंच या बाईक्सच्या लॉन्च बाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या बजाज-ट्रायम्फ यांच्या 400cc बाईक्स ५ जुलै रोजी जागतिक स्तरावर लॉन्च होणार आहेत, त्याच दिवशी बाईक्ससंबंधित सविस्तर माहिती देखील दिली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Bajaj-Triumph 400cc bikes: डिटेल्स

Bajaj-Triumph कंपनी Roadster आणि Scrambler या दोन बाईक्स लॉन्च करणार आहे. या नव्या सिंगल-सिलेंडर बाईक्सद्वारे ट्रायम्फ कंपनी स्पर्धात्मक अ‍ॅन्ट्री-लेव्हल, मिड कॅसिटी सेगमेंटमध्ये पदार्पण करणार आहे. या विभागामध्ये रॉयल एनफिल्डला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. Autocarindia.com च्या वृत्तानुसार, बाईक्समध्ये निओ-रेट्रो डिझाइन पाहायला मिळणार आहे. हे डिझाइन अनेक Bonneville मॉडेल्समध्ये दिसते. या नव्या बाईक्समध्ये इतर ट्रायम्फ बाईक्सप्रमाणे विविध अ‍ॅक्सेसरीजचा समावेश देखील करण्यात आला आहे.

आणखी वाचा – बीएमडब्लूने भारतात लॉन्च केली नवीकोरी BMW M2 हाय परफॉर्मन्स स्पोर्ट्स कार; बुकिंगला झाली सुरुवात, किंमत आहे..

लिक्विड-कूलिंगची क्षमता आणि त्याचे आकारमान पाहता या बाईक्समधील इंजिन हे रॉयल एनफिल्ड 350cc J-प्लॅटफॉर्म इंजिनपेक्षा जास्त शक्तिशाली असेल असे म्हटले जात आहे. सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये बजाज-ट्रायम्फ यांच्यासमोर फक्त रॉयल एनफिल्ड ही सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी आहे. त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीला शह देण्यासाठी ट्रायम्फ या 400cc बाईक्सची किंमत किती ठेवणार आहे याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. बजाज कंपनी बाईक्सच्या या विभागामध्ये प्रवेश करण्यासाठी बऱ्याच वर्षांपासून प्रयत्न करत होती. त्यामुळे या प्रकल्पाबाबत ते फार उत्सुक आहेत. उत्तम गुणवत्ता असलेल्या ट्रायम्फ मॉडेल्स ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी कंपनीने देशातील डीलर्सचे नेटवर्क पुढील २ वर्षात १२० शहरांमध्ये विस्तारण्याचा निर्धार केला आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-06-2023 at 16:27 IST
Next Story
होंडा Elevate की मारुती सुझुकी Grand Vitara; यांपैकी कोणती कार फीचर्समध्ये आहे बेस्ट? जाणून घ्या..