तुम्हीही कार, मोटरसायकल, स्कूटर किंवा इतर कोणतेही वाहन चालवत असाल तर काळजी घ्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे तुम्हाला खूप महागात पडू शकते. खरं तर, मोटार वाहन (सुधारणा) कायदा, २०१९ लागू झाल्यापासून २३ महिन्यांत देशभरात वाहतुकीच्या उल्लंघनासाठी ७.६७ कोटींहून अधिक चलन जारी करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन मोटार वाहन कायदा लागू होण्यापूर्वी २३ महिन्यांच्या कालावधीत वाहतूक चलनाची संख्या १,९६,५८,८९७ होती. नियम लागू झाल्यानंतर २३ महिन्यांच्या याच कालावधीत वाहतूक चालनाची संख्या ७,६७,८१,७२६ होती. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. नितीन गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांची संख्या कॅलेंडर वर्ष २०१९ मध्ये ४,४९,००२ वरून २०२० मध्ये ३, ६६, १३८ वर आली आहे. सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीनंतर चलनाच्या संख्येत वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Be careful if you are driving a car or a bike penalties for violating traffic rules rmt
First published on: 03-12-2021 at 12:34 IST