Bike Tips in winter: सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असून या दिवसात त्वचेची आणि आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. तसेच आपल्या आरोग्यासह या दिवसात बाईकचीदेखील खूप काळजी घ्यावी लागते. कधी कधी थंडीमुळे बाईकचे इंजिन गोठते, त्यामुळे बाईक लवकर सुरू होत नाही. कारण हिवाळ्यात बाहेरचे तापमान खूपच कमी होते, त्यामुळे थंड वारे आणि घसरलेले तापमान याचा परिणाम दुचाकीवर दिसून येतो. अशा परिस्थितीत कधीकधी बॅटरी किंवा इंजिन थंड होते आणि बाईक सुरू होत नाही, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात बाईक रायडिंग करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत.
बाईक रायडिंग करण्यापूर्वी ही काळजी घ्या
हिवाळ्यात बाईकमध्ये पेट्रोल भरले पाहिजे, कारण कमी पेट्रोलमुळे अनेकदा पाण्याचे थेंब टाकीमध्ये दिसतात, ज्यामुळे इंजिनलाही नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत थंडीच्या दिवसात बाईकची पेट्रोल टाकी भरलेली ठेवा, त्यामुळे बाईक सुरू करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
हिवाळ्यात काही लोक बाईक उघड्यावर पार्क करतात, त्यामुळे गार वारा आणि थंडीमुळे बाईक थंड पडते. अशा स्थितीत बाईक लवकर सुरू होत नाही, त्यामुळे थंडीच्या वातावरणात बाईक पार्किंगमध्ये पार्क करा, त्यामुळे बाईकवर थंडीचा प्रभाव कमी होतो आणि बाईक लगेच सुरू होते.
थंडीचा परिणाम बाईकमधील इंजिन ऑइलवर होतो, कारण कमी तापमानामुळे इंजिन तेल लवकर थंड होते, तर बाईक स्टार्ट करताना इंजिन ऑइल सर्वत्र फिरते, त्यामुळे बाईक सुरू होत नाही. अशा स्थितीत बाईक बंद जागेत पार्क करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो.
बाईकची बॅटरीही थंडीच्या वातावरणात लवकर डिस्चार्ज होते, त्यामुळे बाईक स्वतःहून सुरू होत नाही. किक मारल्यानंतरही बाईक सुरू व्हायला खूप वेळ लागतो. विशेषतः सकाळी बाईक सुरू करण्यापूर्वी एकदा बॅटरी तपासा. बॅटरी खराब झाल्यास ती बदलून घ्या.
थंडीत बाईकचे टायर कडक होतात आणि परिणामी पकड गमावतात. हिवाळ्यात तुम्ही तुमच्या बाईकचे टायर्स तपासून घ्यावेत. थंडीमुळे टायरमधील हवा कमी होते, अशा परिस्थितीत टायर पंक्चर होतात; त्यामुळे बाईकचे टायर तंदुरुस्त ठेवण्याचा तसेच त्यातील हवेचा दाब कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा.