भारतीय मार्केटमध्ये चार चाकी गाडयांसह स्कूटरला देखील मोठी मागणी आहे. त्यातच सर्व कंपन्यांमध्ये आता इलेक्ट्रॉनिक गाड्यांची स्पर्धा सुरू आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला देखील ग्राहकांची पसंती मिळत असल्याचे दिसत आहे. सणांच्या काळात तर काही कंपन्यांकडून विशेष डिस्काउंट जाहीर करण्यात येतो. तुम्ही सुद्धा दसऱ्याला किंवा दिवाळीला नवी स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर आधी ही यादी पाहा. ७० हजारांपेक्षा कमी किंमतीत कोणत्या स्कूटर उपलब्ध आहेत जाणून घ्या.

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स (Hero Electric Optima CX)

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
  • या स्कूटरची सुरुवातीची किंमत ६२,३६५ रुपये आहे.
  • तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
  • या स्कूटरची रेंज ८२ केएम पर्यंत आहे.
  • हिरोची ही स्कूटर सध्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे.

आणखी वाचा : ऑडीच्या नव्या लिमिटेड एडिशनचे भारतात विकले जाणार फक्त ५० युनिट्स; जाणून घ्या किंमत आणि आकर्षक फीचर्स

टीवीएस स्कूटी पेप प्लस (TVS Scooty Pep Plus)

  • ही स्कूटर भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय आहे. याची सुरुवातीची किंमत ६१,७५१ रुपये आहे.
  • या स्कूटरमध्ये ८७.८ सीसीचे इंजिन आहे, जे ५.३६ बीएचपी पॉवर जनरेट करते.
  • जर तुम्ही खिशाला परवडणारी स्कूटर शोधत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

हिरो माइस्ट्रो एडज ११० (Hero Maestro Edge 110)

  • तुम्ही ही स्कूटर ६९,४३१ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता.
  • या स्कूटरमध्ये ११०.९ सीसी इंजिन आहे जे ८ बीपीएच पॉवर जनरेट करते.
  • जर तुम्हाला आयसीइ इंजिन असलेली स्कूटर घ्यायची असेल, तर हिरो स्कूटर तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

ओकिनावा R30 (Okinawa R30)

  • या इलेक्ट्रिक स्कूटरची सुरूवातीची किंमत ६१,४१७ रुपये आहे.
  • ही लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर आहे, दैनंदिन प्रवासासाठी हा उत्तम पर्याय आहे.

आणखी वाचा : लाँचआधीच मारुती सुझुकीच्या ‘या’ बहुप्रतीक्षित कारचे झाले ५० हजारांहून अधिक बुकिंग

हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश (Hero Electric Flash)

  • या स्कूटरची सुरुवातीची किंमत ५९,५९४ रुपये आहे.
  • स्कूटरचा टॉप स्पीड २५ किमी प्रतितास आहे.
  • या स्कूटरने एका चार्जवर ८५ किमीचा प्रवास करता येतो. या किंमतीच्या इतर स्कूटरपेक्षा ही रेंज चांगली आहे.