भारतात सात-सीटर SUV खूप लोकप्रिय आहेत. मात्र, मध्यम आकाराच्या सात-सीटर एसयूव्हीच्या आगमनामुळे मोठ्या कारची मागणी आणखी वाढली आहे. या सेगमेंटमध्ये सध्या Mahindra च्या SUV कारचं वर्चस्व पाहायला मिळत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एसयूव्ही सेंगमेंटमध्ये मोठा दबदबा पाहायला मिळतो. या कंपनीच्या कारची विक्रीही जोरात होत असते. महिंद्राच्या एसयूव्हीला भारतीय बाजारपेठेत खूप पसंती दिली जाते. त्यामुळेच त्यांच्या विक्रीत तेजी दिसून येते. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालानुसार, महिंद्राच्या लोकप्रिय सात सीटर कारच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली आहे.

देशात महिंद्राच्या ७ सीटर कारची मागणी जोरदार वाढत आहे. एकत्र कुटुंबपद्दती असल्याने भारतीय जास्त सदस्य बसू शकतील अशा गाड्यांना पसंती देत असतात. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली आहे. महिंद्राची सर्वात स्वस्त कार बोलेरो निओ सात सीटर पर्यायांसह येते. महिंद्राची बोलेरो निओ ही कंपनीची उच्च श्रेणीची एसयूव्ही कार आहे. यात मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. ही कार सहा रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केली जात आहे. कंपनीने गुरुवारी सांगितले की, महिंद्रा बोलेरो आणि महिंद्रा बोलेरो निओच्या मिळून दहा हजार युनिट्स दर महिन्याला बुक केल्या जात आहेत.

Toyota Innova Hycross Bookings Closed
मायलेज २४ किमी, ‘या’ ८ सीटर कारसाठी ग्राहकांच्या रांगा; तुफान मागणी पाहून कंपनीने केलं बुकिंग बंद, किंमत…
Tata Tiago iCNG
किंमत ५.६५ लाख, मायलेज २८.०६ किमी, सेफ्टीतही टाॅपवर; टाटाच्या ‘या’ कारला तोड नाय, बाजारात दणक्यात विक्री
Maruti Eeco 7 Seater Car
किंमत २.८९ लाख, मायलेज १९.७१ किमी; मारुतीची ७ सीटर कार स्वस्तात आणा घरी, कुठे मिळतेय शानदार डील?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Punerkar boy marriage biodata viral
Photo: “पोरगी कसली पण असुदे फक्त…” पुणेकर तरुणानं लग्नाच्या बायोडेटात लिहली अशी अपेक्षा; बायडेटा पाहून पोट धरुन हसाल
Toyota Urban Cruiser Taisor
मायलेज २८.०५, किंमत १० लाखापेक्षाही कमी; ‘या’ ६ एअरबॅग्स असलेल्या कारची ह्युंदाईच्या कारला टक्कर, विक्रीतही टाॅपवर

(हे ही वाचा : मारुतीची स्वस्त कार देशात दाखल होताच उडाली खळबळ! ८ दिवसात १० हजार लोकांनी केली खरेदी, किंमत फक्त…)

चार प्रकार आणि उच्च पॉवर इंजिन

या कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे, ती रिव्हर्स पार्किंग सेन्सर्ससह येते. कंपनी ही कार N4, N8, N10 आणि N10 (O) या चार व्हेरियंटमध्ये देत आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटला अलॉय व्हील आणि लांब टेललाइट मिळतो. निओच्या किमती सध्या ९.९५ लाख ते १२.१५ लाखांच्या दरम्यान आहेत. अलीकडे, महिंद्राने ९-सीटर बोलेरो निओ+ लाँच केले, ज्याची किंमत ११.३९ लाख ते १२.४९ लाख रुपये आहे. कारमध्ये १४९३cc हाय पॉवर डिझेल इंजिन आहे.

महिंद्रा बोलेरो लूक आणि फीचर्स तसेच स्पेसच्या बाबतीत खूपच जबरदस्त आहे. कंपनीचा दावा आहे की, महिंद्रा बोलेरो निओ १७.२९ kmpl पर्यंत कमाल मायलेज देते. कारचा ग्राउंड क्लीयरन्स १६० मिमी आहे, त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये ड्रायव्हर केबिनमध्ये ड्युअल एअरबॅग्ज आहेत. कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्ट हे फीचर आहे. कारमध्ये सात इंची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. बोलेरो निओ कार Hyundai Venue, Kia Sonet, Tata Nexon आणि Maruti Brezza यांच्याशी स्पर्धा करते.

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, यात अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह ७-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, उंची समायोजित करण्यायोग्य ड्रायव्हर सीट, कीलेस एंट्री, महिंद्रा ब्लूसेन्स कनेक्टिव्हिटी, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ नियंत्रणे यांसारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. बोलेरो निओमध्ये तीन रांगेत जागा देण्यात आल्या आहेत. त्याच्या शेवटच्या रांगेत साइड-फेसिंग जंप सीट्स उपलब्ध आहेत.