Best Selling Bike: भारतीय दुचाकी बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. विशेषत: मोटारसायकलींची चांगली विक्री होत आहे. प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनी Hero MotoCorp ही केवळ भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी नाही तर जगातील सर्वात मोठी स्कूटर आणि मोटारसायकल उत्पादक कंपनी आहे. Hero Motocorp ने स्वस्त आणि चांगल्या प्रोडक्शनच्या आधारे भारतातील तसेच जगभरातील दुचाकी बाजारात सर्वाधिक ओळख निर्माण केली आहे. इंडियन टू-व्हीलर मार्केटमध्ये तर हिरोचाच दबदबा आहे. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक मार्केट शेअरसह ही नंबर-१ टू-व्हिलर कंपनी बनली आहे. भारतीय बाजारपेठेत हिरोच्या बाईकची मागणी वाढली असून विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

भारतात एंट्री लेव्हल बाइक्सची मागणी सातत्याने वाढत आहे. याचा अंदाज तुम्ही हिरो स्प्लेंडरच्या विक्रीवरून लावू शकता. भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या दहा बाइक्सपैकी सात बाईक्स एंट्री लेव्हल सेगमेंटमधील आहेत. दरवेळेप्रमाणे यंदाही हिरो स्प्लेंडरने विक्रीचा विक्रम केला आहे. गेल्या महिन्यात स्प्लेंडरच्या ३ लाख ०४ हजार ६६३ युनिट्सची विक्री झाली होती, तर गेल्या वर्षी मे महिन्यातच स्प्लेंडरच्या ३ लाख ४२ हजार ५२६ युनिट्सची विक्री झाली होती. यावेळी कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत ३७,८६३ युनिट्स कमी विकल्या आहेत. सध्या या बाईकचा मार्केट शेअर ३६.०३ टक्के आहे.

हिरो स्प्लेंडरची साधी रचना ही त्याची ओळख आहे. यामुळेच ३० वर्षे पूर्ण होऊनही स्प्लेंडर प्लस ही ग्राहकांची आवडती बाईक आहे. बाईकच्या आकारमानातही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्प्लेंडरला कौटुंबिक वर्गाबरोबरच तरुणांनाही खूप आवडते. ही एक आरामदायी बाईक आहे आणि चालवायला सोपी आहे.
हिरो स्प्लेंडर ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. यामध्ये बसवलेले इंजिन केवळ चांगली कामगिरीच देत नाही तर अधिक चांगला मायलेजही देतात. Hero Splendor Plus मध्ये १००cc i3s इंजिन आहे जे ७.९ bhp पॉवर आणि ८.०५Nm टॉर्क जनरेट करते. यात ४ स्पीड गिअरबॉक्स आहे.

(हे ही वाचा : मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ट्विन सिलिंडरसह ३ सीएनजी कार; हे ऐकताच बाकी कंपन्यांची उडाली झोप! )

कंपनीचा दावा आहे की, या बाईकचे इंजिन चांगले मायलेज देईल आणि ६००० किलोमीटरपर्यंत सर्व्हिसची गरज भासणार नाही. ते प्रति लिटर ७३ किमी मायलेज देते. या बाईकला ५ वर्षे किंवा ७०,००० किलोमीटरची वॉरंटी मिळेल. हिरोने हे इंजिन वेळेनुसार अपडेट केले आहे पण आजपर्यंत त्याची कार्यक्षमता बिघडलेली नाही, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

या बाईकमध्ये तुम्हाला अनेक चांगले फीचर्स मिळतील. यामध्ये तुम्हाला रियल टाइम मायलेजची माहिती मिळेल. याशिवाय यात ब्लूटूथ, कॉल, एसएमएस आणि बॅटरी अलर्टची सुविधा आहे. एवढेच नाही तर यात यूएसबी पोर्ट असेल ज्यामध्ये तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकता. याच्या पुढील आणि मागील टायरमध्ये ड्रम ब्रेकची सुविधा असेल, याशिवाय यात एलईडी टेललाइट आणि हेडलाइट आहे.