Best Selling Bikes in India for 2025: भारतात बाईकच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कमी बजेटमध्ये अधिक फीचर्स आणि जबरदस्त मायलेज, यामुळे ग्राहक बाईकला मोठी पसंती देत आहेत. भारतात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, त्यामुळे ग्राहकांचा कल अधिक मायलेज देणाऱ्या दुचाकी किंवा इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत आहे. चांगलं मायलेज देणार्या दुचाकी लोकांना आकर्षित करत आहेत, यामुळेच गेल्या एका महिन्यात म्हणजेच ३० दिवसांत एका प्रसिद्ध कंपनीच्या बाईकने भारतीय बाजारात विक्रीत बाजी मारली आहे.
हिरो मोटोकॉर्पची दुचाकी भारतीय ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. जर आपण गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२५ मध्ये किरकोळ विक्रीबद्दल बोललो तर या काळात हिरो मोटोकॉर्पने अव्वल स्थान मिळवले आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोटिव्ह डीलर्स असोसिएशन (FADA) नुसार, गेल्या महिन्यात हिरो मोटोकॉर्पने एकूण ५,११,६८७ दुचाकी विकल्या. तथापि, या काळात हिरो मोटोकॉर्पच्या विक्रीत वार्षिक आधारावर ०.१२ टक्क्यांनी घट झाली. या विक्रीच्या जोरावर एकट्या हिरो मोटोकॉर्पने बाजारपेठेचा ३०.३४ टक्के हिस्सा काबीज केला. गेल्या महिन्यात सर्वाधिक दुचाकी विकणाऱ्या १० कंपन्यांच्या किरकोळ विक्रीबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
विक्रीच्या या यादीत होंडा दुसऱ्या क्रमांकावर होती. या कालावधीत होंडाने एकूण ४,०६,१०२ दुचाकी वाहनांची विक्री केली, ज्यामध्ये वार्षिक २.७० टक्के वाढ झाली; तर विक्रीच्या या यादीत टीव्हीएस तिसऱ्या स्थानावर आहे. या कालावधीत टीव्हीएसने एकूण ३,०९,२७४ दुचाकी वाहनांची विक्री केली, ज्यामध्ये वार्षिक १०.१० टक्के वाढ झाली. याशिवाय, विक्रीच्या या यादीत बजाज चौथ्या स्थानावर आहे. या कालावधीत बजाजने एकूण १,८३,०६९ दुचाकी वाहनांची विक्री केली, ज्यामध्ये वार्षिक ६.७४ टक्के घट झाली.
दुसरीकडे, विक्रीच्या या यादीत सुझुकी पाचव्या स्थानावर आहे. या कालावधीत सुझुकीने एकूण ९१,७४१ दुचाकी वाहनांची विक्री केली, ज्यामध्ये वार्षिक १६.९७ टक्के वाढ झाली. तर विक्रीच्या या यादीत रॉयल एनफिल्ड सहाव्या स्थानावर आहे. या कालावधीत रॉयल एनफिल्डने एकूण ८०,०९० दुचाकी वाहनांची विक्री केली, ज्यामध्ये वार्षिक ८.९२ टक्के वाढ झाली, तर यामाहा विक्रीच्या यादीत सातव्या क्रमांकावर होती. या कालावधीत यामाहाने एकूण ५२,२८९ दुचाकी वाहनांची विक्री केली, ज्यामध्ये वार्षिक ६.८५ टक्के घट झाली.
ओला इलेक्ट्रिक विक्रीच्या यादीत आठव्या क्रमांकावर होती. या कालावधीत ओला इलेक्ट्रिकने एकूण १९,७०९ दुचाकी वाहनांची विक्री केली, ज्यामध्ये वार्षिक ४२.३१ टक्के घट झाली; तर विक्रीच्या या यादीत एथर नवव्या क्रमांकावर आहे. या कालावधीत एथरने एकूण १३,१६७ दुचाकी वाहनांची विक्री केली, ज्यामध्ये वार्षिक २१७.७४ टक्के वाढ झाली. तर अँपिअर विक्रीच्या या यादीत दहाव्या क्रमांकावर होती. या कालावधीत अँपिअरने एकूण ४,००० दुचाकी वाहनांची विक्री केली, ज्यामध्ये वार्षिक वाढीचा दर ५९.२४ टक्के आहे.