६.५६ लाखाच्या ‘या’ कारनं Swift, Wagon R, Alto चं वर्चस्व संपवलं, खरेदीसाठी ग्राहक रांगेत!

Best-Selling Maruti Suzuki Car: मारुती सुझुकीच्या ‘या’ कारनं जिंकलं ग्राहकांचं मन, फेब्रुवारीत झाली जबरदस्त विक्री…

Best Selling Car
'या' कारच्या मागे लागले भारतीय (Photo-financialexpress)

Best Selling Hatchback: भारतीय कार बाजारात मारुती सुझुकीचे वर्चस्व कायम आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप-४ गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. या सर्व हॅचबॅक कार आहेत. हे वाचून तुम्ही असा विचार करत असाल की मारुती अल्टो किंवा वॅगनआर ही फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार असायला हवी, जसे की याआधी अनेक महिन्यांत घडले आहे. पण, फेब्रुवारीत तशी स्थिती नाही. मारुती सुझुकी बलेनो या कारची फेब्रुवारी २०२३ मध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. या कारने अल्टो, वॅगनआर आणि स्विफ्टलाही मागे टाकले आहे.

‘या’ आहेत देशातील बेस्ट सेलिंग कार

  • Maruti Baleno: मारुती सुझुकी बलेनोने फेब्रुवारी २०२३ मध्ये १८,५९२ युनिट्स विकल्या, जे फेब्रुवारी २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या १२,५७० युनिट्सपेक्षा ४७.९१ टक्के जास्त आहे. मारुती बलेनोची किंमत रेंज ६.५६ लाख ते ९.८३ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. हे पेट्रोल इंजिन तसेच सीएनजी किट पर्यायासह उपलब्ध आहे.
  • Maruti Swift: फेब्रुवारी २०२३ मध्ये मारुती स्विफ्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, त्याच्या विक्रीत घट झाली आहे. त्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये १८,४१२ युनिट्सची विक्री केली आहे, जी फेब्रुवारी २०२२ मध्ये विकल्या गेलेल्या १९,२०२ युनिट्सपेक्षा ४.११ ट्क्यांनी कमी आहे.

(हे ही वाचा: स्वप्न करा पूर्ण! आली रे आली, BMW ची सर्वात स्वस्त SUV, अवघ्या ७ सेकंदात १०० किमीचा वेग )

  • Maruti Alto: फेब्रुवारी २०२३ मध्ये, मारुती सुझुकी अल्टो तिसऱ्या क्रमांकावर होती, तिने १८,११४ युनिट्सची विक्री केली आहे तर फेब्रुवारी २०२२ मध्ये, ११,५५१ युनिट्सची विक्री झाली. त्याची विक्री ५६.८२ टक्क्यांनी वाढली आहे.
  • Maruti Wagon R:  मारुती वॅगन आर फेब्रुवारी २०२३ मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे, १६,८८९ युनिट्सची विक्री झाली होती तर फेब्रुवारी २०२२ मध्ये १४,६६९ युनिट्सची विक्री झाली होती. त्याची विक्री वार्षिक आधारावर १५.१३ टक्क्यांनी वाढली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 13:20 IST
Next Story
विराट कोहलीने का विकल्या कोट्यवधींच्या लक्झरी कार, खरं कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का!
Exit mobile version