Best Selling SUV Cars: भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठ गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदलले आहे. भारतीय बाजारपेठेत मिड साईज एसयूव्हींना मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळते. या सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स आणि महिंद्रा या दोन कंपन्यांचं वर्चस्व पाहायला मिळतो. इतरही कंपन्यांच्या कार या सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. देशातील सर्वात स्वस्त एसयूव्हीकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे. भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात एसयूव्ही सेगमेंटच्या कार खरेदी करत आहेत. २०२४ च्या पहिल्या सहामाहीत, भारतातील एकूण कार विक्रीमध्ये एकट्या SUV विभागाचा वाटा ५२ टक्के आहे. या कालावधीत, टाटा पंचने वार्षिक ६४.३५ टक्के वाढीसह एकूण १,१०,३०८ एसयूव्हींची विक्री करून अव्वल स्थान प्राप्त केले. मात्र, मागणीच्या बाबतीत एका कारनेही सर्वांना मागे सोडले आहे. चला तर जाणून घेऊया या कारबाबत…

मारुती सुझुकी फ्रॉन्क्सने या काळात विक्रीत मोठी मजल मारत सर्वांना मागे सोडले आहे. मारुती सुझुकी फ्रॉन्क्सने या कालावधीत १८९.०५ टक्के वार्षिक वाढीसह एकूण ७६,९९७ SUV ची विक्री केली आहे. Maruti Suzuki Fronx ही देशातील एकमेव SUV आहे ज्या कारनं बाजारपेठेत दाखल होताच १० महिन्यांत १ लाख कारच्या विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. या कारचे खास वैशिष्टये आज आपण जाणून घेऊयात…

Vasai, car dealers and garages, Roads Vasai,
वसई : वाहन विक्रेते व गॅरेज वाल्यांकडून रस्ते गिळंकृत, रस्त्यावरच वाहन विक्रीचा बाजार व दुरुस्ती; वाहतुकीला अडथळे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Tourism to Prosperity Nifty India Tourism Index print eco news
पर्यटनातून समृद्धीकडे…:  निफ्टी इंडिया टुरिझम इंडेक्स
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
The price in the gold market in Delhi is Rs 77 thousand 850 print eco news
सोन्याला सार्वकालिक उच्चांकी झळाळी; दिल्लीतील सराफा बाजारपेठेत भाव ७७ हजार ८५० रुपयांवर
Women Work Stress
EY Employee Death : कामाच्या अतिताणाने ॲनाचा मृत्यू, जगभरात भारतातील महिला करतात सर्वाधिक तास काम!
Loksatta pahili baju What is the next step of Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana
पहिली बाजू: आयुष्मान भारत : सर्वसमावेशक सेवेसाठी!
loco pilots, Loco cab, toilet, mumbai, लोको पायलट,
आमची दैना… असुविधांचा लोको पायलटना फटका, २०४ लोको कॅबमध्ये स्वच्छतागृह नाही

(हे ही वाचा : किंमत ५.७३ लाख, मायलेज ३४ किमी; देशातील बाजारात ‘या’ ५ स्वस्त सीएनजी कारला तुफान मागणी, पाहा यादी )

ग्राहकांना मारुती सुझुकी फ्रॉन्क्समध्ये दोन इंजिनचा पर्याय मिळतो. पहिले १.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे जे जास्तीत जास्त १००bhp पॉवर आणि १४८Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तर दुसरे १.२-लीटर पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे जे ९०bhp ची कमाल पॉवर आणि ११३Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय ग्राहकांना मिळतो. याशिवाय, कारमध्ये CNG पर्याय देखील उपलब्ध आहे जो जास्तीत जास्त ७७.५bhp पॉवर आणि ९८Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

दुसरीकडे, कारच्या केबिनमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, क्रूझ कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंगला सपोर्ट करणारी ९-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, सुरक्षेसाठी, एसयूव्हीमध्ये ६-एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता प्रोग्राम आणि ३६०-डिग्री कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. मारुती सुझुकी फ्रॉन्क्सची बाजारात Kia Sonet, Hyundai Venue, Tata Nexon, Mahindra XUV 3X0 आणि Maruti Brezza सारख्या SUV सोबत स्पर्धा आहे. मारुती फ्रॉन्क्सची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ७.५१ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी १३.०४ लाख रुपयांपर्यंत जाते.