Best Selling SUV Car: मारुती सुझुकी देशात सर्वाधिक गाड्यांची विक्री करणारी कंपनी आहे. मारुती स्वस्त ते महाग अशा सर्व प्रकारच्या गाड्या बाजारपेठेत आणत असते. एवढेच नाही तर कंपनी हॅचबॅक, सेडान आणि एसयूव्ही सेगमेंटमध्ये वाहनांचे अनेक मॉडेल्स बनवत आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय मिळतात आणि त्यामुळे लोक मारुतीच्या वाहनांकडे आकर्षित होतात. अधिकाधिक वाहने विकण्यासाठी बाजारात कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. पूर्वी मारुती प्रत्येक मॉडेल आणि डिझाइनच्या वाहनांवर वर्चस्व गाजवत असे, परंतु आता मारुतीला बाजारपेठेत इतर कंपन्यांकडून खडतर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. टाटा मोटर्स आणि ह्युंदाई सारख्या कंपन्या यात आघाडीवर आहेत.

टाटा मोटर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी सफारी आणि सुमो सारख्या मोठ्या वाहनांसाठी बाजारात ओळखली जात होती. पण बाजाराचा अंदाज घेत कंपनीने बजेट सेगमेंटमध्ये एसयूव्ही वाहने सादर केली आहेत, ज्यामुळे मारुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. मारुती ज्या किमतीत हॅचबॅक ऑफर करत आहे त्याच किमतीत टाटा मोटर्स कॉम्पॅक्ट एसयूव्ही विकत आहे आणि तेही ५-स्टार सुरक्षा रेटिंगसह. याचा अर्थ कंपनी मारुतीला किंमत, मॉडेल आणि सुरक्षा या तिन्ही बाबतीत आव्हान देत आहे. आता याच कारणामुळे, टाटा मोटर्सची एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही जून २०२४ मध्ये देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे.

Hyundai Exter SUV
किंमत ६ लाख, मायलेज २७.०१ किमी; देशातील बाजारात ‘या’ सर्वात लहान SUV ला तुफान मागणी; ३६५ दिवसात ९३ हजार कारची विक्री
Maruti Suzuki Car
मायलेज २६ किमी, ‘या’ ७ सीटर कारच्या खरेदीसाठी मोठी गर्दी; तुफान मागणीमुळे ४३ हजार कारची डिलीव्हरी पेंडिंग, किंमत…
Car Sales Drop in May 2024
देशातील बाजारात ‘या’ २ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; ३० दिवसात फक्त ४ लोकांनी केली खरेदी
Affordable Car
किंमत ३.९९ लाख, एक लिटर पेट्रोलवर धावते २५ किमी, लहान कुटुंबासाठी एकदम परफेक्ट ठरते ‘ही’ मारुती कार
Toyota Urban Cruiser Taisor
किंमत ७.७३ लाख, मायलेज २८.०५ किमी; ‘या’ SUV ला तुफान मागणी अन् आता वेटिंग पीरियड झाला कमी
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”
Maruti Suzuki Swift
मायलेज २५.७२ किमी, देशातल्या ३० लाख लोकांनी खरेदी केली मारुतीची ‘ही’ स्वस्त कार; खरेदीसाठी लागल्या रांगा, किंमत…

(हे ही वाचा : विक्री होईना आता मारुतीच्या ‘या’ SUV कारवर २.५ लाखापर्यंत डिस्काउंट; पाहा भन्नाट ऑफर, होईल तुमच्या पैशांची बचत )

या टाटा कारला परिचयाची गरज नाही. येथे आम्ही टाटा पंच SUV बद्दल बोलत आहोत, या कारला गेल्या महिन्यात १८,००० हून अधिक लोकांनी पहिली पसंती दिली आहे. जून २०२४ मध्ये, टाटा पंच १८,२३८ गाड्यांच्या विक्रीसह नंबर-वन सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली. तसेच विक्रीत मारुतीच्या नवीन पिढीच्या स्विफ्टलाही मागे टाकले.

टाटा पंच ही ५ सीटर मायक्रो एसयूव्ही आहे ज्याची किंमत ६ लाख ते ९.४७ लाख रुपये आहे. त्याचे १.२-लिटर पेट्रोल इंजिन ८६PS आणि ११३ Nm जनरेट करते तर CNG वर आउटपुट कमी होते. CNG वर ते ७७ PS आणि ९७ Nm जनरेट करते. पंचसह ५-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे.

टाटा पंच सीएनजी २६.९९ किमी/किलो पर्यंत मायलेज देऊ शकते तर पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन प्रकार २०.०९ kmpl पर्यंत मायलेज देऊ शकतात आणि पेट्रोल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्रकार १८.८ kmpl पर्यंत मायलेज देऊ शकतात. कारमध्ये ७.० इंच टचस्क्रीन सिस्टीम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक हेडलाइट्स आणि वायपर्स, ऑटो एसी आणि क्रूझ कंट्रोल सारखी वैशिष्ट्ये आहेत.