Best Small Cars in India: भारतीय बाजारपेठेत अनेक कार उपलब्ध आहेत. पण, सध्या बाजारात असलेल्या कारमध्ये लोक सुरक्षा वैशिष्ट्यांव्यतिरिक्त लूक आणि स्टाईलवर अधिक लक्ष देतात. म्हणूनच, जर तुम्हीही नवीन कार घेणार असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत. देशांतर्गत बाजारपेठेत अशा अनेक कार आहेत, ज्या अधिक काळापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत त्यांचा समावेश आहे. भारतात छोट्या कारची विक्री कमी होत असली तरी त्यांचा कल अजून कमी झालेला नाही. खेड्यापाड्यात आणि लहान शहरांमध्ये अजूनही लोक छोट्या कार घेण्यास प्राधान्य देतात. छोट्या गाड्या बजेटमध्ये बसतात आणि त्यांची देखभालही खूप कमी असते. जर तुम्हीही अशाच कारच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही स्वस्त आणि कॉम्पॅक्ट कारची माहिती देत ​​आहोत ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

‘या’ छोट्या कार्सना भारतात बम्पर डिमांड

मारुती सुझुकी एस-प्रेसो

मारुती सुझुकी S-Presso चे डिझाईन नक्कीच कॉम्पॅक्ट आहे पण त्यात जागा खूप चांगली आहे. त्याच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे, तुम्ही ही कार अरुंद रस्त्यांपासून हायवेपर्यंत आरामात चालवू शकता. यात १.०L पेट्रोल इंजिन आहे. ही कार एका लिटरमध्ये २५.३० किलोमीटर मायलेज देते. या कारची बसण्याची स्थिती तुम्हाला एखाद्या एसयूव्हीसारखी वाटते. कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह ईबीडी आणि एअरबॅग्जची सुविधा आहे. या कारची किंमत ४.२६ लाख रुपयांपासून सुरू होते.

Maruti Suzuki Swift
मायलेज २५.७२ किमी, देशातल्या ३० लाख लोकांनी खरेदी केली मारुतीची ‘ही’ स्वस्त कार; खरेदीसाठी लागल्या रांगा, किंमत…
Car Sales Drop in May 2024
देशातील बाजारात ‘या’ २ कारकडे ग्राहकांनी फिरवली पाठ; ३० दिवसात फक्त ४ लोकांनी केली खरेदी
Affordable Car
किंमत ३.९९ लाख, एक लिटर पेट्रोलवर धावते २५ किमी, लहान कुटुंबासाठी एकदम परफेक्ट ठरते ‘ही’ मारुती कार
Best Selling 7-Seater Car
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद! झाली तुफान विक्री, मायलेज २७ किमी
Hyundai Exter SUV
किंमत ६ लाख, मायलेज २७.०१ किमी; देशातील बाजारात ‘या’ सर्वात लहान SUV ला तुफान मागणी; ३६५ दिवसात ९३ हजार कारची विक्री
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Best Selling SUV
मारुतीची Wagon R नव्हे तर Tata ची ‘ही’ स्वस्त SUV खरेदीसाठी उडतेय ग्राहकांची झुंबड, ३० दिवसात १८ हजाराहून अधिक गाड्यांची विक्री
Jasprit Bumrah Viral Funny Video Post IND vs ENG
“बुमराह तू ये, माझा हात..”, IND vs ENG मॅच जिंकताच अंपायरच्या भेटीला गेला जसप्रीत पण.. Video पाहून चाहते लोटपोट

(हे ही वाचा : बाजारात ७.४६ लाखाच्या ‘या’ ५ सीटर SUV ला तुफान मागणी, १४ महिन्यांत १.५ लाखाहून अधिक कारची विक्री, मायलेज…)

मारुती सुझुकी अल्टो K10

मारुती सुझुकी अल्टो K10 मध्ये देखील कॉम्पॅक्ट डिझाइन आहे. त्याचे इंटीरियर अगदी S-Presso सारखेच आहे. Alto K10 हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. लहान आणि अरुंद वाटेवरून तुम्ही या कारने सहज प्रवास करू शकता. या कारमध्ये शक्तिशाली १.०L पेट्रोल इंजिन आहे. ही कार एका लिटरमध्ये २४.९० किलोमीटर मायलेज देते. या कारमध्ये ५ जण बसू शकतात. सुरक्षिततेसाठी, कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD आणि एअरबॅग्ज आहेत. K10 Alto K10 ची दिल्लीतील एक्स-शो रूम किंमत ३.९९ लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो

मारुतीची सेलेरियो आपल्या स्टायलिश कॉम्पॅक्ट डिझाइनसह ग्राहकांना आकर्षित करत आहे. त्याच्या कॉम्पॅक्ट आकारामुळे, तुम्ही ही कार अगदी अरुंद रस्त्यावरूनही सहज चालवू शकता. यात शक्तिशाली १.०L पेट्रोल इंजिन आहे आणि ही कार एका लिटरमध्ये २६.६८ किलोमीटरचे मायलेज देते. सुरक्षिततेसाठी, कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD आणि एअरबॅग्ज आहेत. त्याची किंमत ५.३६ लाख रुपयांपासून सुरू होते.

रेनॉल्ट क्विड

स्पोर्टी डिझाईनमुळे ही कार तरुणांसोबतच कौटुंबिक वर्गालाही आवडते. त्याचा फ्रंट लुक सगळ्यात जास्त प्रभावित करतो. यात १.०L इंजिन आहे. ही कार एका लिटरमध्ये २१-२२ kmpl मायलेज देते. ही कार ईबीडी आणि एअरबॅगसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह येते. त्यातील फीचर्स बऱ्यापैकी आहेत. या कारमध्ये ५ जण सहज बसू शकतात. Renault Kwid ची किंमत ४.६९ लाख रुपये आहे.