देशात दरवर्षी ५ लाख वाहन अपघात होतात. ज्यामध्ये दीड लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ३० मार्च २०२२ रोजी राज्यसभेत सांगितले की, भारत NCAP म्हणून ओळखल्या जाणार्‍या नवीन वाहन सुरक्षा मूल्यमापन धोरणाला देशात सरकारने अधिसूचित केले आहे. त्यामुळे आता वाहन कंपन्यांना भारत एनसीएपीच्या मानकांनुसार चारचाकी वाहने तयार करावी लागतील. यामुळे अपघातातील मृत्यूचं प्रमाण कमी होईल, असं गडकरी राज्यसभेत काँग्रेस खासदार केटीएस तुलसी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. तुलसी यांनी वाहन अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे का, असा सवाल केला होता. भारत नेशन क्रॅश असिस्टन्स प्रोग्राम अंतर्गत आता चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. यासोबतच चारचाकीमध्ये ३ पॉइंट सीट बेल्ट आणि सीट बेल्ट अलर्ट सिस्टीम द्यावी लागणार आहे. यासोबतच प्रौढ आणि मुलांसाठी सुरक्षा वैशिष्ट्ये प्रदान करावी लागतील. याशिवाय चारचाकी वाहनांच्या बोनेटची रचनाही भारत एनसीएपीनुसार करावी लागेल.

राज्यसभेत मांडण्यात आलेल्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये २५,२८९ अपघात झाले, त्यापैकी ३० टक्के जीव साइड एअरबॅगने वाचवता आले असते, तर ३१ टक्के जीव समोर एअरबॅग्समुळे वाचवता आले असते. यावेळी गडकरी म्हणाले की, “आम्हाला लोकांच्या जीवाचे रक्षण करायचे आहे आणि त्यामुळेच आम्ही कंपन्यांसाठी ‘रेटिंग सिस्टिम’ देखील सुरू करणार आहोत. यामुळे वाहन निर्मिती क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील आणि निर्यातीलाही चालना मिळेल.

Vehicle Scrapping Policy: आजपासून ‘या’ गाड्यांची होणार फिटनेस टेस्ट, चाचणीत अयशस्वी ठरल्यास जाणार भंगारात

युरोप आणि इतर आशियाई देशांमध्ये फक्त ग्लोबल NCAP चाचणी कारना प्रवेश मिळतो. ज्यामध्ये कार क्रॅश दरम्यान प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेमध्ये १ ते ५ स्टार रेट केले जातात. महिंद्रा XUV 7oo, Tata Nexon आणि XUV 3oo सारख्या कारना प्रौढ आणि मुलांच्या सुरक्षेत ५ स्टार रेटिंग मिळाले आहे.