Premium

केवळ ३ हजार ५०० रुपयात घरी न्या Hero ची ‘ही’ बाईक; दर महिना भरा ‘इतके’ रुपये, १ लिटर पेट्रोलमध्ये धावेल ७० किमी

‘या’ बाईकला देशातील मध्यमवर्गीय आणि नोकरदार लोक सर्वाधिक पसंती देतात.

Hero HF Deluxe
बाईक फायनान्स प्लॅन (Photo-financialexpress)

भारतीय बाजारपेठेतील तरुण ग्राहकांना कार आणि बाईकचे प्रचंड वेड आहे. देशातील बहुतेक लोक बाईकला प्राधान्य देतात. पेट्रोल खूप महाग झाले असले तरी जास्त मायलेज असलेल्या बाईक्स नक्कीच थोडा दिलासा देतात. जर तुम्ही दररोज वापरण्यासाठी नवीन बाइक खरेदीचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते. येथे आम्ही तुम्हाला जास्त मायलेज देणारी बाईक स्वस्तात कशी खरेदी करता येईल, याविषयी माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला अशा बाईकबद्दल सांगणार आहोत जी तुम्ही केवळ ३,४४६ रुपये देऊन खरेदी करू शकता. या बाईकचे मायलेजही खूप चांगले आहे. यामुळे तुम्ही गाडी चालवून पेट्रोलवरील खर्चातही बचत करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Hero ची ‘ही’ बाईक स्वस्तात आणा घरी

हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ची एचएफ डिलक्स (HF Deluxe) बाईक मायलेजच्या बाबतीत खूपच चांगली आहे. यामुळेच ही लोकांच्या आवडत्या बाइक्सपैकी एक आहे.  हिरो एचएफ डिलक्स बाईकला ९७.२ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन मिळते जे ८.०२ पीएस पॉवर आणि ८.०५ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ४ स्पीड गिअरबॉक्स उपलब्ध आहेत. हिरो एचएफ डिलक्स बाईकच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक ७० किमी प्रति लीटर मायलेज देते.

(हे ही वाचा : १५ वर्षापासून भारतीय लोक मारुतीच्या ‘या’ कारच्या लागले मागे, २५ लाख ग्राहकांनी केली खरेदी, मायलेज ३४ किमी )

‘इतका’ भरावा लागेल EMI

Hero HF Deluxe किंमत ५९,०१८ रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. जर तुम्हाला ती कर्जावर खरेदी करायची असेल, तर अनेक फायनान्सर तुम्हाला ही बाईक फक्त ३,५०० रुपयांच्या डाउन पेमेंटवर उपलब्ध करून देतात. जर तुम्ही या बाईकवर ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी ६५,४७३ रुपयांचे कर्ज घेतले तर तुम्हाला १० टक्के व्याजदराने दरमहा २,३६४ रुपयांचा EMI भरावा लागेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bike finance plan hero hf deluxe lowest down payment 3500 and emi read complete bike deatils pdb

First published on: 18-09-2023 at 13:58 IST
Next Story
Petrol-Diesel Price on 18 September: पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव