man ride with dog on bike in ladakh video went viral | Loksatta

Bike Ride with Dog : व्यक्तीने श्वानासोबत दिल्ली ते लडाख असा बाईकने केला प्रवास, पाहा व्हिडिओ

एका व्यक्तीने आपल्या श्वानासह लडाखमधील सर्वात उंच वाहतूक मार्गावरून प्रवास केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Bike Ride with Dog : व्यक्तीने श्वानासोबत दिल्ली ते लडाख असा बाईकने केला प्रवास, पाहा व्हिडिओ
(pic credit – one_crazy_guy)

Man ride with dog on bike : लेह लडाख या सारख्या ठिकाणी रायडर्स बुलेट किंवा इतर वाहनांवर प्रवास करताना तुम्हाला दिसून आले असतील. कदाचित रायडिंगबाबत असलेले पॅशन हेच त्यांना अशा खडतर आणि आव्हान देणाऱ्या मार्गावरून वाट काढण्साठी आत्मविश्वास देत असावे. अनेक लोक बाईकच्या मागे बांधलेल्या भरघोस सामानासह एकटे किंवा इतर व्यक्तीबरोबर हा थरारक प्रवास करतात. मात्र, एका व्यक्तीने आपल्या श्वानासह लडाखमधील सर्वात उंच वाहतूक मार्गावरून प्रवास केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये चाऊ सुरेंग राजकंवर आपली पाळीव श्वान बेलासह कस्टमाइज्ड बाईकवर चित्तथरारक भागातून प्रवास करताना दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये राजकंवरने आपल्या प्रवासाबाबत माहिती दिली आहे. बेलाला दिल्लीहून लडाख घेऊन जाणे हा सोपा निर्णय नव्हता. यासाठी बाईकमध्ये बदल करायचे होते, प्रवासाठी बेलाला ट्रेनिंग द्यायचे होते आणि कस्टमाइज्ड सीट तयार करायची होती, या सर्व योजना राजकंवर यांनी व्हिडिओतून सांगितल्या. तसेच आपल्या संपूर्ण प्रवासाविषयी व्हिडिओतून थोडक्यात माहिती दिली.

(रेहमान यांच्या मुलींना इलेक्ट्रिक वाहनाची भुरळ, खरेदी केली ‘ही’ स्पोर्ट कार, तिच्यात काय आहे खास? जाणून घ्या)

दोघांनीही आधी झंकसार सर्किट आणि नंतर लडाख सर्किंट बाईकवरून पूर्ण केले. लडाखमध्ये अनेक माउंटेन क्रॉस, वॉटर क्रॉस, हाय अल्टीट्यूड वाळवंटामधून प्रवास केला आणि नंतर उमलिंगला पासमध्ये तिरंगा फडकवल्याचे व्हिडिओतून सांगण्यात आले. दोघेही खडतर भागातून प्रवास करताना व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत. राजकंवर यांना श्वानासोबत बाईकवर या खडतर भागातून प्रवास करून आपण एक नवीन विश्व विक्रम केल्याची आशा आहे. जर श्वानासोबत असा प्रवास यापूर्वी कोणी केला नसेल तर हा विश्व विक्रम आहे, असे त्यांनी बेलासोबत छायाचित्र असलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

हा व्हिडिओ पहिल्यांदा १६ नोव्हेंबरला शेअर करण्यात आला होता. व्हिडिओला लोकांची प्रचंड पसंती मिळत आहे. व्हिडिओला 13 लाख व्ह्युज मिळाले असून लाखो लाइक्स मिळाले आहेत. अनेक युजर्सनी दोघांचे कौतुक केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 15:35 IST
Next Story
रेहमान यांच्या मुलींना इलेक्ट्रिक वाहनाची भुरळ, खरेदी केली ‘ही’ स्पोर्ट कार, तिच्यात काय आहे खास? जाणून घ्या