scorecardresearch

फक्त १८ लाख मिळतंय BMW 3Series 320d लग्झरी कार; शोरूम किंमत आहे ४५ लाख रुपये

एका ऑफरद्वारे तुम्ही कार केवळ १८ लाखांच्या बजेटमध्ये म्हणजेच निम्म्याहून कमी किंमतीत खरेदी करू शकता.

BMW-3Series-320d-1
फक्त १८ लाख मिळतंय BMW 3Series 320d लग्झरी कार; शोरूम किंमत आहे ४५ लाख रुपये (फोटो- CARS24)

देशात लक्झरी कार घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. कारण या गाड्यांची किंमत इतकी असते की, मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीयांना त्या कार खरेदी करणे परवडत नाही. पण तुम्ही प्रीमियम आणि लक्झरी कारचे शौकीन असाल, तर आम्ही तुम्हाला BMW 3 सीरीज 320d लक्झरी कारवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सची संपूर्ण माहिती सांगणार आहोत. ही कार जर तुम्ही शोरूममधून खरेदी केली तर तुम्हाला यासाठी ४५.१८ लाख रुपये खर्च करावे लागतील. पण एका ऑफरद्वारे तुम्ही ही कार केवळ १८ लाखांच्या बजेटमध्ये म्हणजेच निम्म्याहून कमी किंमतीत खरेदी करू शकता.

या कारवरील आजची ऑफर सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री करणार्‍या वेबसाइट CARS24 ने दिली आहे. आपल्या साइटवर ही लक्झरी कार सूचीबद्ध केली आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कारची किंमत किंमत १८,४२,६९९ रुपये आहे. हे मॉडेल सप्टेंबर २०१५ चे आहे. आजपर्यंत ३३,९५८ किमी चालली आहे. ही BMW 3 सिरीज 320d कारचा दुसरा मालक आहे. ही कार HR 03 RTO कार्यालय, हरियाणा येथे नोंदणीकृत आहे. तुम्ही ही कार खरेदी केल्यास कंपनी काही अटींसह सहा महिन्यांची वॉरंटी योजना देत आहे. तसेच सात दिवसांच्या मनी बॅक गॅरंटी आहे. मनी बॅक गॅरंटीनुसार, जर तुम्हाला कार खरेदी केल्यानंतर सात दिवसांच्या आत आवडत नसेल किंवा त्यात काही दोष आढळला तर तुम्ही ती कंपनीला परत करू शकता. ही कार परत केल्यानंतर, कंपनी तुम्हाला तुमचे पूर्ण पेमेंट कोणत्याही प्रश्नाशिवाय किंवा कोणत्याही कपातीशिवाय परत करेल.

मजबूत इंजिन, स्टाइलसह ५० किमीपर्यंतचा मायलेज देणाऱ्या तीन क्रुझर बाइकबद्दल जाणून घ्या

कोणतीही सेकंड हँड कार खरेदी करताना कारची स्थिती, इंजिनची स्थिती, अपघाताची माहिती आणि कंपनीने दिलेली हमी आणि अटी नीट समजून घेतल्या पाहिजेत. जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली नाही तर कार खरेदी केल्यानंतर तुम्हाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2021 at 10:48 IST