BMW CE 04 electric scooter BMW CE 04 price: BMW या कंपनीचे नाव ऐकले नसेल अशी एकही व्यक्ती नाही. BMW ही एक लक्झरी कार उत्पादक कंपनी आहे, जी आपल्या कारची केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विक्री करते. याच बीएमडब्ल्यू कंपनीनं अखेर भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर सीई ०४ लाँच केली आहे. सध्या भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या स्कूटरमध्ये ही देशातील सर्वात महागडी स्कूटर बनली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल.

बीएमडब्ल्यूची ही इलेक्ट्रिक स्कूटर ८.५ kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे. ही स्कूटर एका चार्जवर १३० किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरला चार्ज करण्यासाठी दोन चार्जिंग पर्याय देण्यात आले आहेत. ही EV स्टँडर्ड २.३ kW चार्जरने चार्ज केली जाऊ शकते, ज्यामुळे या स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ४ तास २० मिनिटे लागतात. त्याचवेळी या ईव्हीचे जलद चार्जिंगदेखील केले जाऊ शकते. जलद चार्जिंगसाठी, ६.९ kW चा चार्जर वापरला जाऊ शकतो, ज्यामुळे ही स्कूटर केवळ एक तास ४० मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकते.

Amrapali Gan is an Indian-origin CEO
भारतीय वंशाची आम्रपाली गान आहे US मधील अ‍ॅडल्ट वेबसाइट ओन्लीफॅन्सची CEO
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Nitin GAadkari
Nitin Gadkari : दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेल वाहनांच्या दरात मिळतील : नितीन गडकरी
How to Apply for duplicate driving Licence Online and offline
ड्रायव्हिंग लायसन्स हरवले? टेन्शन घेऊ नका, असे बनवा डुप्लीकेट ड्रायव्हिंग लायसन्स; जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रकिया
Airtel partnered with Apple to offer Apple TV+ and Apple Music
Airtel Partnered With Apple : एअरटेल ऑफर करणार Apple TV+ Apple Music; ॲपलबरोबरच्या पार्टनरशिपचा कसा होणार युजर्सना फायदा?
educational opportunities for engineering students
शिक्षणाची संधी : अभियांत्रिकीमधील संधी
Ola roadster first electric motorcyles series to launch in india know features and price
Ola Roadster: ओलाची पहिली इलेक्ट्रिक बाईक सीरीज झाली लॉंच, फिचर्स अन् लूकची होतेय चर्चा, जाणून घ्या किंमत
BSA Gold Star launched in India at Rs 3.0 lakh— Royal Enfield Interceptor rival
BSA Gold Star 650: रॉयल एनफिल्डचे धाबे दणाणले, ब्रिटीश कंपनीने १५ ऑगस्टला भारतात लाँच केली ‘ही’ बाईक; पाहा किंमत

BMW CE 04: डिझाइन

यात सायकल-स्टाईलच्या बॉडी पॅनेलच्या खाली एक स्टील डबल लूप फ्रेम आहे. यात समोर एक सिंगल-ब्रिज टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस स्ट्रेट हिंग्ड सस्पेन्शन स्ट्रटसह सिंगल-साइड स्विंगआर्म आहे. त्यात एबीएस हे स्टँडर्ड म्हणून उपलब्ध आहे. सध्या हे एकच व्हेरिएंट लॉंच करण्यात आले आहे. तुम्ही ही स्कूटर इम्पीरियल ब्लू आणि लाइट व्हाईट कलरमध्ये खरेदी करू शकाल.

हेही वाचा >> THAR प्रेमींसाठी आनंदाची बातमी: १५ ऑगस्टला येणार ५ दरवाजे असणारी ‘THAR ROXX’, जाणून घ्या नवे फिचर

BMW CE 04: देशातील सर्वात महागडी स्कूटर, किंमत किती?

BMW ने आपली इलेक्ट्रिक स्कूटर १४.९० लाख रुपयांनी लाँच केली आहे. या स्कूटरनंतर दुसरी सर्वात महागडी स्कूटर Vespa 946 Dragon Edition आहे, ज्याची किंमत १४.२८ लाख रुपये आहे.