बीएमडब्ल्यू आणि ऑडी या दोन्ही कंपन्या आलिशान कार्सचे उत्पादन करतात . या दोन्ही कंपन्यांच्या BMW X1 आणि Audi Q3 भारतीय बाजारपेठेत लाँच झाली आहे. तर आपण आज या दोन्ही SUV पैकी कोणती SUV अधिक आलिशान फीचर्सनी सुसज्ज आहे तसेच या दोन्ही एसयूव्हीबद्दलची माहिती जाणून घेऊयात.

जाणून घेऊयात BMW X1 चे इंजिन व स्पीड

BMW X1 sDrive 18d M Sport या मॉडेलमध्ये १,९९५ सीसी , ४ सिलेंडर डीज़ल इंजिन येते. हे इंजिन १४५ बीएचपी आणि ३६० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही कार ८.९ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडते. तर BMW X1 sDrive 18i xLine या मॉडेलचे इंजिन हे १,४९९ सीसीचे, तीन सिलेंडरचे पेट्रोल इंजिन येते. जे १३२ बीएचपी आणि २३० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ०.९ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडते. दोन्ही इंजिनमध्ये ७ स्पीड स्टेपट्रॉनिक ड्युअल-क्लच मिळते.

Competition among 7 companies under incentive scheme for ACC production
‘एसीसी’ उत्पादनासाठी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ७ कंपन्यांमध्ये चढाओढ
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
Kia adds two new automatic variants
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Kia ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे आणले २ नवे व्हेरिएंट, किंमत…

हेही वाचा : Honda Bikes: फक्त २० हजारांमध्ये मिळणार तुमची आवडती Honda Shine, काय करावं लागणार?

जाणून घेऊयात Audi Q3 चे इंजिन व स्पीड

Audi Q3 चे डिझेल व्हेरियंटचे इंजिन हे १९६८ सीसीचे इंजिन आहे. जे ३५००-४००० आरपीएमवर १८१ बीएचपी आणि १७५०-३००० आरपीएम ३८० एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार ७.९ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग पकडू शकते. याच्या स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास ही कार ताशी २१९ किमी वेगाने धावू शकते.

Audi Q3 चे पेट्रोल व्हेरियंटचे इंजिन हे १३९ सीसीचे इंजिन आहे. जे ५०००-६००० आरपीएम वर १४७.५१ बीएचपी पॉवर आणि १५००-३५०० वर २५० एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही कार ८.९ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास इतका वेग घेऊ शकते. ही एसयूव्ही ताशी २०४ किमी वेगाने धावू शकते.

हेही वाचा : Bajaj Auto: आनंदाची बातमी! फक्त १५ हजारांमध्ये घरी घेऊन या Bajaj Platina 110, देणार ‘इतके’ जबरदस्त मायलेज

BMW X1 व Audi Q3 ची किंमत

BMW (BMW) ने भारतीय बाजारपेठेत X1 SUV लाँच केली आहे. हे पेट्रोल आणि डिझेल या दोन प्रकारांमध्ये येते. BMW X1 SUV ची एक्स-शोरूम किंमत ही ४५.९५ लाख ते ४७.९० लाख इतकी आहे.

ऑडी Q3 हे मॉडेलसुद्धा पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये येते. याची एक्सशोरूम किंमत ही ४४.८९ लाख ते ५०.३९ लुकाः रुपये इतकी आहे.