BMW India ने भारतात आपली सर्व-इलेक्ट्रिक SUV IX सादर केली आहे. कंपनीचा दावा आहे की BMW iX Pure Electric SUV मध्ये ड्युअल लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे, जी एकावेळी ४२५ किमीची रेंज देते. म्हणजेच एका चार्जवर ते ४२५ किमी अंतर कापेल. या कारची किंमत १.१६ कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे.

BMW iX ला AC आणि DC अशा दोन्ही फास्ट चार्जरने चार्ज करता येते. १५० kW DC फास्ट चार्जर BMW iX ला ३१ मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकतो, ज्यामुळे ते ९५ किमीचे अंतर आरामात कापू शकते. ५० kW DC चार्जर वापरून, इलेक्ट्रिक SV ७३ मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते, तर AC ​​चार्जर सात तासांत SUV पूर्णपणे चार्ज करू शकतो.

Samsung launched on Friday a new variant of its popular budget F15 smartphone Here is all the details
२० हजारांपेक्षा कमी किमतीत सॅमसंगचा ट्रिपल कॅमेरा सेटअपचा स्मार्टफोन; बॅटरी लाईफ बघून म्हणाल ‘डील Done’
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल

कर डिझाईन

BMW iX च्या डिझाईनबद्दल सांगायचे तर, यात इंटिग्रेटेड एलईडी डेटाइम रनिंग लाइट्ससह शार्प ड्युअल-बीम एलईडी हेडलॅम्प देण्यात आले आहेत. तसेच, यात एक मोठी किडनी ग्रिल आणि हाताने डिझाइन केलेले बंपर आणि ३D बोनेट मिळेल. दुसरीकडे, कारच्या साइड प्रोफाइलमध्ये स्पोर्टी आणि मोठ्या अलॉय व्हील्स, फ्लेर्ड शोल्डर्स, आयताकृती चाकाच्या कमानी, फ्रेमलेस खिडक्या, बॉडी इंटिग्रेटेड डोअर हँडल्स यांचा समावेश आहे आणि कारचा स्वच्छ लुक तिला खूपच आकर्षक बनवतो. कारच्या मागील बाजूबद्दल बोलायचे झाले तर, यात स्लीक एलईडी टेललाइट्स आहेत.

इंटीरियर

कारच्या इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, BMW IX मध्ये सर्व प्रकारचे लेआउट आणि फीचर्स दिसतात. यात ड्रायव्हरच्या बाजूला १४.९इंचाचा टचस्क्रीन वक्र ग्लास इन्फोटेनमेंट डिस्प्ले, १२.३-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, रेस-कार-प्रेरित हेक्सागोनल स्टीयरिंग व्हील, स्काय लाउंज पॅनोरमा ग्लास रूफ, मसाज फंक्शनसह मल्टीफंक्शन सीट्स, लेदर अपहोल्स्टर लाइट, आणि १८ स्पीकर हरमन कार्डन सराउंड साउंड सिस्टम उपलब्ध आहे. यात १,७५० लिटर क्षमता आणि बूट स्टोरेज आहे.

६.१ सेकंदात १०० किमीपर्यंत वेग

BMW IX ६.१ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग वाढवते. कारला पर्सनल, स्पोर्ट आणि एफिशियंट असे तीन ड्रायव्हिंग मोड मिळतात. IX इलेक्ट्रिक SUV ला सेन्सर, कॅमेरा आणि रडार तंत्रज्ञान, फ्लश डोअर ओपनर, समोरच्या लोगोच्या खाली वॉशर, मागील खाली वॉशर देखील मिळतो. इलेक्ट्रिक कार असूनही, ती IconicSounds इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाद्वारे ड्रायव्हिंगचा आवाज देखील करते.