BMW India ने भारतात आपली सर्व-इलेक्ट्रिक SUV IX सादर केली आहे. कंपनीचा दावा आहे की BMW iX Pure Electric SUV मध्ये ड्युअल लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे, जी एकावेळी ४२५ किमीची रेंज देते. म्हणजेच एका चार्जवर ते ४२५ किमी अंतर कापेल. या कारची किंमत १.१६ कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

BMW iX ला AC आणि DC अशा दोन्ही फास्ट चार्जरने चार्ज करता येते. १५० kW DC फास्ट चार्जर BMW iX ला ३१ मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकतो, ज्यामुळे ते ९५ किमीचे अंतर आरामात कापू शकते. ५० kW DC चार्जर वापरून, इलेक्ट्रिक SV ७३ मिनिटांत ८० टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते, तर AC ​​चार्जर सात तासांत SUV पूर्णपणे चार्ज करू शकतो.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmw ix ev india range bmw first electric car price range features color bmw suv scsm
First published on: 21-01-2022 at 14:01 IST