BMW Motorrad ने बहुप्रतिक्षेनंतर भारतात F900 GS आणि F900 GS Adventure लाँच केली आहे. यामध्ये पहिला मॉडल १३.७५ लाख रुपयांचा आहे तर दुसऱ्या मॉडलची किंमत १४.७५ लाख रुपये आहे. हे दोन्ही वेरिअंट पूर्णपणे कंप्लीटली बिल्ट अप (CBU) मॉडलच्या स्वरुपात आहे. कंपनीने या दोन्ही मॉडलच्या बुकींगची सेवा मागील महिन्यापासून सुरू केली आहे.
F900 GS आणि F900 GS Adventure दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. पहिला मॉडल जीएस ट्रॉफी व्हेरिअंटमध्ये लाइट पांढरा सॉलिड पेंट आणि रेसिंग ब्लू मॅटेलिक च्या डुअल टोन कॉम्बिनेशनबरोबर खरेदी करू शकता. तर दुसरा मॉडल F900 GS Adventure ला काळा स्टॉर्म मॅटेलिक आणि मॅट पांढरा अॅल्युमिनियम रंगाच्या पर्यायासह खरेदी करू शकता.
BMW F900 GS आणि GS या दोन्ही वेरिअंटमध्ये ८९५cc, लिक्विड-कूल्ड, दोन सिलेंडर इन लाइन इंजिन आहे जे ८,५०० rpm वर १०४ bhp आणि ६,७५० rpm वर ९३ Nm चा टॉर्क तयार करते. पावर ला ६-स्पीड गिअरबॉक्सद्वारे रिअर व्हील मध्ये ट्रान्सफर केले जाते.
BMW च्या मते, या नव्या F900 GS ला राइडिंगसाठी चांगल्याप्रकारे ऑफ-रोड वापरू शकतो. नवीन F900 GS चा हँडलबार आता मागील मॉडलच्या तुलनेत १५ मिमी उंच आहे याशिवाय आता स्टँडर्ड एंड्यूरो फुटरेस्टला २० मिमी खाली ठेवण्यात आले आहे. उंच हँडलबार पोझिशन आणि फ्यूल टँकच्या नव्या डिजाइनमुळे राइडरला खडतर रस्त्यावरून प्रवास करण्यास सोपी जाते.
F900 GS आणि F900 GS Adventure चे फीचर्स
F900 GS मध्ये स्टँडर्ड स्वरुपात फुल LED लायटिंग, मल्टी राइडिंग मोड, पावर मोड, हीटेड हँडलबार ग्रिप, ट्रॅक्शन कंट्रोल, ABS, डायरेक्शन क्विक शिफ्टर, एक USB चार्जिंग पोर्ट आणि एक ६.५ इंच कलर TFT इन्स्ट्रुमेंट पॅनल आहे. इन्स्ट्रुमेंटेशन ब्लूटूथ कनेक्टिविटीची सेवा प्रदान करते जे नेविगेशन आणि संगीत ऐकण्याशिवाय कॉल आणि टेक्स्टविषयी सुचना देते.
ग्राहक आपल्या आवडीनुसार नवीन F900 GS रेंज ला कस्टमाइज करण्यासाठी BMW एक्सेसरीजची एक एक्सटेंडेड रेंज सुद्धा निवडू शकतात. दोन्ही वेरिअंटमध्ये काही फरक आहे जे त्यांना एकमेकांपासून वेगळे दाखवतात.
हेही वाचा : Hyundai : शार्क-फिन अँटेना, डॅशकॅमसह बरीच फीचर्स; मार्केटमध्ये येतेय नवी SUV; किंमत फक्त…
F 900 GS ला तुम्ही ऑफ-रोड ट्रिप्स साठी वापरू शकता त्यामुळे रॅली-इंस्पायर्ड बॉडी वर्क, २२६ किलोग्रॅमपेक्षा कमी कर्ब वजन, ८७० मिमीच्या सीटची उंची आणि थोडा लहान १४.५ लीटर इंधन टँक आहे.
याशिवाय F900 GS Adventure ट्रिम ला एक वर्सेटाइल ऑलराउंडर च्या स्वरूपात डिझाइन केले आहे. यामध्ये एक्सटेंडेड रेंजसाठी मोठा 23-लीटर फ्यूल टँक आणि ८७५ मिमीच्या सीटची उंची दिली आहे.